इस्रायल दौऱ्याला इतका उशीर का?

1950 मध्ये भारतानं इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली. पण इस्रायलसोबत राजकीय संबंध प्रस्थापित व्हायला 1992 साल उजाडलं. त्याचं कारण म्हणजे भारताचे पॅलेस्टाईनसोबत असलेले संबंध.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 10:03 AM IST

इस्रायल दौऱ्याला इतका उशीर का?

कौस्तुभ फलटणकर, 05 जुलै: मोदींचा विदेश दौरा आता नवा राहिलेला नाही. पण आता ज्या देशाच्या ते दौऱ्यावर आहेत तिथं भारतीय पंतप्रधानाला जायला साठ पासष्ट वर्षांपेक्षा जास्त काळ लागावा याचंच खरं तर आश्चर्य आहे. बरं इस्रायल काही लहानसहान देश नाही. दहशतवाद्यांच्या घरात घुसून मारण्याची हिंमत असणारा हा एकमेव देश आहे. त्यामुळेच मोदींच्या दौऱ्यात पाकिस्तानसह दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी काय चर्चा होते याकडे लक्ष लागलंय.

1950 मध्ये भारतानं इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली. पण इस्रायलसोबत राजकीय संबंध प्रस्थापित व्हायला 1992 साल उजाडलं. त्याचं कारण म्हणजे भारताचे पॅलेस्टाईनसोबत असलेले संबंध. इस्रायल हा मुस्लिमविरोधी देश म्हणूनही ओळखला जातो. त्याच्याशी संबंध जोडले तर आपले अरब तसंच इतर मुस्लिम देशांशी असलेले संबंध बिघडतील अशा भीतीतून भारतानं इस्रायलपासून दोन हात दूर रहाणंच पसंत केलंय. पण आता मात्र स्थिती बदलल्याचं दिसतंय.

जसवंतसिंगांनी पररष्ट्र मंत्री म्हणून इस्रायलचा पहिल्यांदा दौरा केला. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा भारताचा दौरा केला. त्यानंतरही इस्रायला दौरा करायला भारतीय पंतप्रधानाला 14 वर्षे लागलेत. बदललेल्या सामरिक स्थितीत हे अंतर कमी होणं काळाची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...