Home /News /videsh /

या कारणांमुळेच इम्रान खान यांनी पेपर वाचणं आणि टीव्ही पाहणं केलं बंद

या कारणांमुळेच इम्रान खान यांनी पेपर वाचणं आणि टीव्ही पाहणं केलं बंद

मी 40 वर्षं सार्वजनिक जीवनात आहे. त्यामुळे टीका हा माझ्या कामाचा एक भाग आहे. पण गेलं दीड वर्षं मला मीडियाने लक्ष्य केलं आहे, असं इम्रान खान म्हणाले.

    दाओस, 23 जानेवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जागितक माध्यमांमध्ये सतत चर्चेत असतात पण गेले काही दिवस मात्र पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना माध्यमांनी चांगलंच लक्ष्य केलं आहे. माझ्याबद्दल माध्यमं नकारात्मकता पसरवत आहेत, असं म्हणत त्यांनी माध्यमांवरच बहिष्कार टाकला आहे. सध्या मी वर्तमानपत्रं वाचणं आणि टीव्हीवरचे डिबेट शो पाहणं बंद केलंय, असं इम्रान खान यांनी सांगितलं. स्वर्ग पाहिजे पण... आम्ही पाकिस्तानमध्ये संस्थात्मक आणि प्रशासकीय पातळीवरच्या सुधारणा करत आहोत पण सुधारणा होतानाच्या वेदना असतातच. तुम्हाला स्वर्गात तर जायचं असतं पण मरायची इच्छा नसते, तसंच हे आहे, असं ते म्हणाले.दाओसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) या परिषदेत सहभाग घेण्यासाठी इम्रान खान दाओसला पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीच्या अनंत शक्यता आहेत, असं इम्रान खान यांनी सांगितलं. (हेही वाचा : 'पाकिस्तानी, बांग्लादेशी चले जाव', राज ठाकरे 9 फेब्रुवारीला काढणार मोर्चा) 40 वर्ष सार्वजनिक जीवनात मी 40 वर्षं सार्वजनिक जीवनात आहे. त्यामुळे टीका हा माझ्या कामाचा एक भाग आहे. पण गेलं दीड वर्षं मला मीडियाने लक्ष्य केलं आहे. त्यामुळेच मी पेपर वाचणं आणि चॅट शो पाहणं बंद केलं. माझ्यासमोर हा एकच पर्याय आहे, असं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं. (हेही वाचा : केम छो ट्रम्प? 'हाउडी मोदी' नंतर ट्रम्प आणि मोदी पुन्हा येणार एका मंचावर) माझे प्रशासकीय अधिकारी या बातम्या पाहतात आणि मला याबद्दल सांगतात. त्यांना मी एवढंच सांगेन की, जरा धीर धरा, असं ते म्हणाले. पाकिस्तानला अच्छे दिन येतील, असा विश्वासही इम्रान खान यांनी व्यक्त केला.
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Imran khan, WEF

    पुढील बातम्या