चाणक्य त्यांच्या 'जन्मभूमीत'च उपेक्षित

चाणक्य त्यांच्या 'जन्मभूमीत'च उपेक्षित

आज पाकिस्तानात असलेल्या तक्षशिला विद्यापीठाजवळच्या ग्रामीण भागात चाणक्यांचा जन्म झाल्याचा दावा 'व्हाय ग्रेट फिलोसॉफर कौटिल्य नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान्स हिस्टोरिकल कॉन्शियसनेस' या लेखात केला गेला आहे.

  • Share this:

पाकिस्तान, 4 ऑगस्ट : साऱ्या जगात ज्यांना एक सर्वोत्तम राजकीय विचारवंत मानलं जातं त्या चाणक्यांना त्यांच्या जन्मभूमीत अर्थात पाकिस्तानातल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये स्थानही नाही अशी खंत पाकिस्तानातल्या नामांकित 'डॉन' न्यूज पेपरमध्ये सैफ ताहीर या लेखकाने व्यक्त केली आहे. आज पाकिस्तानात असलेल्या तक्षशिला विद्यापीठाजवळच्या ग्रामीण भागात चाणक्यांचा जन्म झाल्याचा दावा या लेखात केला गेला आहे.

सैफ ताहीर यांनी लिहिलेल्या 'व्हाय ग्रेट फिलोसॉफर कौटिल्य नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान्स हिस्टोरिकल कॉन्शियसनेस' या लेखात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. चाणक्यांचा जन्म एका गरीब ब्राम्हण घरात झाला होता. ते तक्षशिला विद्यापीठात शिकले आणि तिथेच ते अध्यापकही होते. त्यांचे विचार आज जगातील अनेक विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. त्यांच्या अस्तित्वाचा एकमेव पुरावा तक्षशिला विद्यापीठाचे भग्न अवशेष आहेत जे पाकिस्तानात आहे. पण पाकिस्तानातले खूप कमी लोक चाणक्यांचा इतिहास जाणतात. पाकिस्तानला आपला गैर इस्लामी इतिहास स्वीकारण्याची गरज आहे असंही या लेखात ताहीर यांनी नमूद केलंय.

फक्त हिंदू असल्यामुळे एखाद्या महापुरुषाला त्याचं कार्य न जाणता नाकारणं चुकीचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानचे हे 70वं स्थापना वर्ष आहे.

First published: August 4, 2017, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading