बीजिंग 27 एप्रिल: कोरोना व्हायरसने सगळं जग हैरान आहे. 185 देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बहुतांश देशांनी लॉकडाऊन केलं आहे. सगळे व्यवहार ठप्प आहेत. असं असताना ज्या देशातून कोरोना पसरला त्या चीनमध्ये मात्र आता सगळे व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून असलेली बंधनं हळू हळू दूर करण्यात येत आहेत.
राजधानी बीजिंग आणि शांघाय सारख्या मोठ्या शहरांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेस सुरू झाले आहेत. दुकानं आणि वाहतुकीलाही सुट देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून कोरोनाचे तुरळक रुग्ण सापडत आहे. जानेवारी महिन्यातच चीनमध्ये कोरोनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चीनने अतिशय कठोर निर्णय घेत लॉकडाऊन केलं. अनेक बंधणं लादली आणि कोरोनाला प्रसार रोखला.
त्यानंतर हा आजार सर्व जगभर पसरला. आज 185 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. जगभरातल्या जवळपास 30 लाख लोकांना कोरोनाने ग्रासलं असून 2 लाख लोकांचा मृत्यू झालाय. चीनच्या भूमिकेमुळेच हा आजार जगभर पसरल्याचा आरोप होत आहे.
किम यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक
काही महिन्यांपूर्वी कोव्हिड-19चा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमधील रूग्णालयात दाखल झाला आणि तिथून कोरोना साथीचा हा आजार अवघ्या जगभरात पसरला. वृत्तसंस्था पीटीआयने, चीनची अधिकृत न्यूज एजन्सी शिन्हुआच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, वुहानमध्ये कोव्हिड-19चा आता एकही रुग्ण शिल्लक नाही. 76 दिवस म्हणजेच किमान अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर 8 एप्रिलला वुहानमध्ये लॉकडाऊन उघडण्यात आलं.
घरच्यांनी केली अंत्यसंस्काराची तयारी, पण कोरोनाला हरवत परतला हा पठ्ठ्या
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रवक्त्या मी फेंग यांनी सांगितलं की, वुहानच्या आरोग्य कर्मचार्यांच्या परिश्रम आणि देशभरातून ज्यांना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी पाठवण्यात आलं होतं त्यांच्या मदतीमुळे हे यश शक्य झालं आहे. शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, प्रवक्त्यानं सांगितलं की, वुहानमधील शेवटच्या रुग्णाला शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यानंतर वुहानमधील कोरोना रूग्णांची संख्या शून्यावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China