अमेरिकेत 67 वर्षांनंतर पहिल्यांदा महिलेला मृत्यूदंड, गरोदर महिलेचं पोट फाडून अर्भक काढलं होतं बाहेर

अमेरिकेत 67 वर्षांनंतर पहिल्यांदा महिलेला मृत्यूदंड, गरोदर महिलेचं पोट फाडून अर्भक काढलं होतं बाहेर

लिसा मोंटगोमेरी 2004 मध्ये पाळीव कुत्रा खरेदी करण्याचा बहाणा करून बॉबी स्टीनेट (Bobbi Stinnet) या महिलेच्या मिसुरी येथील घरात घुसली होती.

  • Share this:

वॉशिंग्टन, 14 जानेवारी : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) महिला अपराधी लिसा मोंटगोमेरी (Lisa Montgomery) हिला मृत्यूदंड (Execution) देण्याची संमती न्याय विभागाला दिली आहे. त्यामुळे 52 वर्षांच्या लिसा हिला बुधवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 1 वाजून 31 मिनिटांनी lethal injection देऊन मृत्यूदंड देण्यात आला. लिसाने 16 वर्षांपूर्वी एका गरोदर महिलेची गळा दाबून हत्या केली होती त्यानंतर तिने चाकूने तिचं पोट फाडून तिच्या पोटातलं 8 महिन्यांचं बाळ ओढून बाहेर काढलं होतं. बाळाला घेऊन ती पळून गेली होती. या प्रकरणात तिचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ती तुरुंगात होती पण अमेरिकी न्याय संस्थेने मृत्यूदंडाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले नव्हते. गुन्ह्याला 16 वर्षं उलटल्यानंतर मानवी दृष्टिकोनातून लिसाची शिक्षा माफ करावी असे प्रयत्नही झाले.

अमेरिकेमध्ये 67 वर्षांनंतर एखाद्या महिला कैद्याला मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे. या आधी अमेरिकी सरकारने 18 डिसेंबर 1953 ला बॉनी ब्राउन हेडी या महिलेला मृत्यूदंड दिला होता. मिसुरीत 6 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि त्याचा खून केल्याचा आरोप बॉनीवर होता. तो सिद्ध झाल्यावर तिला ही शिक्षा झाली होती.

मोंटगोमेरीला देण्यात येणारा मृत्यूदंडही रोखण्यात आला होता

लिसाला झालेल्या या शिक्षेला आठव्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपीलच्या वतीने स्थायी स्वरूपाची स्थगिती दिली होती.

कोलंबिया जिल्ह्यातील यूएस सर्किट कोर्ट अपीलने पण लिसाला मृत्यूदंड न देण्याचे आदेश दिले होते. पण बुधवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती आणि आदेश दोन्ही निरस्त करून लिसाला शिक्षा सुनावली. या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर फेडरल ब्युरो ऑफ प्रिझनने लिसाच्या Execution बाबत प्रक्रिया सुरू केली.

लिसाने 2004 मध्ये केला होता गर्भवतीचा खून

लिसा मोंटगोमेरी 2004 मध्ये पाळीव कुत्रा खरेदी करण्याचा बहाणा करून बॉबी स्टीनेट (Bobbi Stinnet) या महिलेच्या मिसुरी येथील घरात घुसली होती. स्टीनेट त्यावेळी आठ महिन्यांची गरोदर होती. लिसाने स्टीनेटची गळा आवळून हत्या केली आणि नंतर तिचे पोट फाडून त्यातील अर्भक घेऊन ती फरार झाली होती. त्यावेळी लिसा 36 वर्षाची होती. ती बाळाला घेऊन कान्सास इथं गेली तिथंच पोलिसांनी तिला अटक केली होती. 2008 मध्ये तिला न्यायालयाने दोषी ठरविले होते. मोंटगोमेरीनं पळवलेली मुलगी व्हिक्टोरिया आता सोळा वर्षांची झाली असून, तिला लिसाकडून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांकडे सोपवलं होतं.

या आधी 8 डिसेंबर रोजी या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार होती; मात्र अॅटर्नी जनरल विलियम बर्र यांनी लिसा मोंटगोमेरी हिच्या शिक्षेची तारीख 12 जानेवारी केली होती. 12 जानेवारीला रात्री उशिरा लिसाची मानसिक स्थिती तपासणं गरजेचं आहे असं सांगत इंडियानातील जिल्हा जज पॅट्रिक हॅनलॉननी हा मृत्यूदंड थांबवला होता, पण 13 जानेवारीला त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्याआधी लिसाला टेक्सासच्या कार्सवेलमधील एका फेडरल मेडिकल सेंटरमध्ये ठेवलं होतं. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचा या फाशीच्या अंमलबजावणीला विरोध होता. पण त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वीच ही शिक्षा देण्यात आली.

वकिलांनी केला होता विरोध

लिसाच्या वकिलांनी तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा तर्क देऊन तिची मृत्यूदंडाची शिक्षा रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून लिजा तुरुंगात असल्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागला आहे असाही तर्क त्यांनी दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अखेर तिला मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला.

First published: January 14, 2021, 11:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading