Home /News /videsh /

नेमका कसा आणि कुठून झाला कोरोनाचा प्रसार? अखेर WHO चा मोठा खुलासा

नेमका कसा आणि कुठून झाला कोरोनाचा प्रसार? अखेर WHO चा मोठा खुलासा

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाने अलीकडेच एका वरिष्ठ युरोपीय नेत्यासमोर कबूल केलं की जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचं वुहान हेच कारण असल्याची शक्यता सर्वात जास्त आहे.

    नवी दिल्ली 20 जून : कोरोना महामारीने (Corona Pandemic) जगभर हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला असून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. जगातील बहुतेक देशांनी या महामारीसाठी चीनला जबाबदार धरलं आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) कधीही याची पुष्टी केलेली नाही. पण आता डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयसस यांनी नुकतीच वुहानबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. Lassa Fever: ना कोरोना ना मंकीपॉक्स, नायजेरियात पसरली 'लासा'ची साथ, आतापर्यंत 155 जणांचा मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाने अलीकडेच एका वरिष्ठ युरोपीय नेत्यासमोर कबूल केलं की जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचं वुहान हेच कारण असल्याची शक्यता सर्वात जास्त आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनच्या वुहानच्या प्रयोगशाळेत रासायनिक दुर्घटना झाली आणि 2019 मध्ये संसर्ग प्रथम येथून समोर आला. कोविड-19 आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करताना डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, आम्हाला कोरोनाच्या प्रकरणांची ओळख करून जवळपास अडीच वर्षे उलटून गेली आहेत. परंतु तो कुठून आला आणि कसा पसरला आणि मानवांपर्यंत कसा पोहोचला याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अरे देवा! कोरोना महासाथीत आता Acute enteric epidemic; नव्या आजाराच्या उद्रेकाने चिंता वाढवली हे लक्षात घेण्यासारखं आहे की गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने 27 तज्ञ लोकांची एक टीम तयार केली होती. या टीमचं काम महामारी किंवा या साथीच्या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा शोध घेणं आणि त्यांचा अभ्यास करणं हे होतं. आपल्या पहिल्या अहवालात, वैज्ञानिक सल्लागार गटाने जोर देऊन सांगितलं की या सर्वात वाईट जागतिक साथीच्या आजारामागील विषाणूची उत्पत्ती कशी आणि कुठून झाली याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष सापडला नाही. या टीमला SARS CoV-2 विषाणूच्या उत्पत्तीचा तपास पुढे नेण्यासाठी स्वतंत्र मूल्यमापन करण्याचं काम देण्यात आलं होतं. तज्ज्ञांच्या टीमने मान्य केलं की महामारी आणि विषाणूचा उगम शोधण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नाही. हे शोधण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज असल्याचं त्यांनी सांगितले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या