Home /News /videsh /

कमला हॅरिसांसोबतच अमेरिकी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले दुसरे भारतीय वंशाचे उमेदवार सुनील फ्रीमन कोण आहेत?

कमला हॅरिसांसोबतच अमेरिकी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले दुसरे भारतीय वंशाचे उमेदवार सुनील फ्रीमन कोण आहेत?

अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत मूळचे भारतीय वंशाचे 2 अमेरिकी नागरिक उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.

  वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत मूळचे भारतीय वंशाचे 2 अमेरिकी नागरिक उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि पार्टी फॉर सोशलिझम अँड लिबरेशनचे (पीएसएल) उमेदवार सुनीला फ्रीमन. जरी सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा कमला हॅरिस या सोशलिस्ट म्हणजे समाजवादी असल्याचं आपल्या भाषणांतून सांगितलं असलं तरीही फ्रीमन हे कट्टर समाजवादी अजेंडा असलेले उमेदवार आहेत. कोण आहेत सुनील फ्रीमन? सुनील फ्रीमन हे 65 वर्षांचे असून ते वॉशिंग्टनच्या उपनगरात असलेल्या रायटर्स सर्कल या संस्थेतून निवृत्त झाले आहेत. अमेरिकेतील सर्वांत जुनं कवितांचं मासिक पोएट लोर या सर्कलच्या माध्यमातून प्रकाशित केलं जातं. फ्रीमन यांच्या आईचं नाव फ्लोरा नविता या मूळच्या भारतीय आहेत. त्यांचे वडिल चार्ल्स फ्रीमन एका अमेरिकी शांतता समितीच्या माध्यमातून भारतात आले होते. त्यावेळी भारताच्या फाळणीनंतर वाराणसीमधील एका निर्वासितांच्या छावणी फ्लोरा शिक्षिका म्हणून काम करत होत्या. तिथं त्यांच्या आई-वडिलांची भेट झाली. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत फ्रीमन यांनी त्यांच्या आईबद्दल सांगितलं. ते म्हणाले, ‘ माझी आई नेहमी साडी नेसायची आणि अनेक शतकं अमेरिकेत राहूनही तिनी भारतीय नागरिकत्व सोडलं नव्हतं. ती नवी दिल्ली आणि लखनौमध्ये लहानाची मोठी झाली आणि इसाबेल थॉर्बन कॉलेजातून तिनी पदवी घेतली होती.’ सुनील यांचं आयुष्य वॉशिंग्टनमध्ये गेलं. 10 वर्षांचे असताना त्यांनी भारताला दिलेली भेट ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरल्याचं ते सांगतात. हे वाचा-इतिहासातील सर्वात महागडी अमेरिकेतील 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पीएसल पक्षाची भूमिका काय ? पीएसएल या पक्षाची भूमिका सांगताना सुनील म्हणाले, ‘आमची कम्युनिस्ट संघटना आहे. कम्युनिस्ट समाज निर्माण करण्याची एक पायरी म्हणजे समाजवाद आहे आणि तसा समाज निर्माण करणं ही खूप दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आमच्या दृष्टिनी समाजवाद म्हणजे ज्यात उत्पादनाच्या साधनांवर कामगारांचं नियंत्रण असेल आणि त्या अधिकारांचा ते समाजाच्या हितासाठी वापर करतील. आम्ही हिंसाचाराची हाक देत नाही. आम्ही सध्याच्या कायदा व्यवस्थेतच काम करणार आहोत. अमेरिकेत असमानता वाढत आहे, लाखो लोक आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत तसंच हवामानाचं संकटही आ वासून उभं आहे. या सगळ्या प्रश्नांवर भांडवलशाहीकडे योग्य उत्तरं नाहीत त्यामुळेच अमेरिकी लोकांचा समाजवादाकडे कल वाढत आहे.’ पीएसएलने आपल्या वेबसाइटवर आपण "क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष" आहोत असं म्हटलंय. ग्लोरिया ला रिवा या पीएसएल पक्षाच्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्या 2008 पासून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत फ्रीमन यांनी प्रवेश केल्यामुळे अमेरिकेतील डाव्या उजव्या आणि मध्यममार्गी विचारांच्या सर्वच पक्षांत भारतीय अमेरिकी नेतृत्वाचा उदय होताना दिसतो आहे. निकी हेली या रिपब्लिकन पक्षातील नेत्या आहेत. हे वाचा-पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्का; Zoom बैठकीत लागलं 'जय श्री राम'चं गाण VIDEO अमेरिकेत प्रत्येक पक्षाला प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे निवडणुकीसाठी पात्र ठरावं लागतं. पीएसएल कॅलिफोर्निया, न्यूजर्सी आणि इलिऑनिस यासह 14 राज्यांत निवडणूक लढणार असून, न्यूयॉर्कसह इतर 14 राज्यांत ‘Write in’ पक्ष म्हणून निवडणुकीत सहभागी होईल. राइट इन प्रकारात मतदारांना जर पीएसएल किंवा इतर पक्षाला मत द्यायची इच्छा असेल तर ते मतपत्रिकेवर पेनाने त्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव लिहितात आणि ते मत गृहित धरून त्याची मोजणी केली जाते. एकाच उमेदवाराला एकाहून अधिक पक्ष पाठिंबा देऊ शकतात त्यामुळे सुनील आणि ग्लोरिया यांच्या उमेदवारीला काही राज्यांत पीस अँड फ्रीडम पार्टी आणि लिबर्टी युनियन पार्टीचा पाठिंबा मिळाला आहे. पीएसएलने पहिल्यांदा मूळचे अमेरिकी चळवळीतील कार्यकर्ते लिओनार्ड पेल्टियर यांना उपाध्यक्षपदाचा उमेदवार निवडलं होतं. पण ते सध्या तुरुंगात असून त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे सुनील यांनी संधी मिळाली आहे. 1975 मध्ये स्थानिक अमेरिकी आणि पोलिसांमध्य झालेल्या मारामारीत लिओनार्ड यांनी दोन पोलिसांचा खून केला होता. त्या प्रकरणात ते दोषी म्हणून तुरुंगात आहेत. जातीयवादाविरुद्ध लढ्याचं बाळकडू आपल्याला आईपासून जातीयतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाल्याचं सुनील सांगतात. त्यांची आई लहानपणी भारतात शाळेत असताना तिच्या वर्गातील ब्रिटिश गोरी मुलं तिला ब्लॅकी म्हणून चिडवायची आणि त्यांना विरोध करण्यासाठी त्यांची आई त्यांना व्हायटी म्हटली होती. पण तत्कालीन शाळेच्या प्रशासनानी त्यांना कठोर शिक्षा केली होती, अशी आठवण सुनील सांगतात. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच जातियतेविरुद्ध लढण्याचं बाळकडू मिळाल्याचं ते सांगतात. त्यांचे वडिल गोरे होते आणि ते अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांत काही काळ राहिले. त्याचकाळात त्या भागात सेग्रिगेशन कायद्यांचा आधार घेत जातीयतेला उधाण आलं होतं. पण चार्ल्स फ्रीमन यांचं कुटुंब प्रगतीशील विचारांची होती आणि त्यांनी कायमच जातीयतेचा विरोध केला असंही सुनील यांनी सांगितलं. त्यांचे वडील क्वाकर्स या ख्रिश्चन धर्मातील एका पंथांचे होते. या पंथाचा युद्धांना विरोध होता आणि तो शांतीच्या मार्गाने जाणारा पंत आहे. त्यामुळेच शांततेचा प्रसार करण्यासाठी त्यांचे वडिल भारतात फाळणीवेळी आले होते. त्याचवेळी त्यांच्या आईची आणि वडिलांची भेट झाली. कमला हॅरिस यांनी लहानपणी आईवडिलांसोबत जातीयवादविरोधी निदर्शनांत भाग घेतल्याचं जसं सांगतात तसंच सुनील यांनीही अमेरिका-व्हिएतनाम युद्धावेळी युद्धविरोधी निदर्शनांत भाग घेतला आहे असं ते सांगतात. हे वाचा-'या' देशात वाढतोय कोरोनाचा सर्वाधिक धोक, पुन्हा एकदा केली लॉकडाऊनची घोषणा

  कमला यांच्यावर टीका

  ‘कमला हॅरिस यांनी गरिब आणि नोकदरांविरुद्ध आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. त्या प्रॉसिक्युटर आहेत पण ज्यांच्याविरुद्ध फिर्याद करायला हवी आणि ज्यांची चौकशी व्हायला हवी त्यांच्याविरुद्ध त्या काहीच करत नाहीत,’ अशा शब्दांत सुनील यांनी कमला हॅरिस यांच्यावर टीका केली आहे. भारतातील अविस्मरणीय दिवस आपण बालपणी दोन वर्ष भारतात राहिल्याचं सुनील आवर्जून सांगतात. 1965 साली वयाच्या 10 व्या वर्षी सुनील वडिलांच्या असाइनमेंटमुळे एक वर्ष भारतात राहिले होते. त्या वेळी त्यांना आजी आपल्या दोन भारतीय मामांसोबत राहण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन बॉम्बे विमातळावर उतरल्यावर मला घरी आल्यासारखं वाटलं होतं आणि तोच माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय क्षण होता असंही सुनील सांगतात.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: United States of America, US elections

  पुढील बातम्या