मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोण आहे पुतीन यांची ही 'कथित मुलगी'? तिला लोकं म्हणतायंत Daughter of Devil

कोण आहे पुतीन यांची ही 'कथित मुलगी'? तिला लोकं म्हणतायंत Daughter of Devil

फोटो सौजन्य- डेलीमेल

फोटो सौजन्य- डेलीमेल

पुतीन यांच्यासह त्यांचे कुटुंबही टीकेचे धनी होत असून, सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. याचा सर्वाधिक फटका लुईझा रोसोवा या 18 वर्षांच्या तरुणीला बसला आहे. लुईझा पुतीन यांची मुलगी असल्याची चर्चा असून, सोशल मीडियावर तिला टार्गेट केलं जात आहे.

पुढे वाचा ...
मॉस्को, 03 मार्च: सध्या जगभरात सर्वत्र रशिया (Russia-Ukraine War) आणि युक्रेनच्या युद्धाचीच चर्चा होत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यावर जोरदार टीका होत असून, रशियातील जनताही त्यांच्या या निर्णयाचा विरोध करत आहे. पुतीन यांच्यासह त्यांचे कुटुंबही टीकेचे धनी होत असून, सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. याचा सर्वाधिक फटका लुईझा रोसोवा या 18 वर्षांच्या तरुणीला बसला आहे. लुईझा पुतीन यांची मुलगी असल्याची चर्चा असून, सोशल मीडियावर तिला टार्गेट केलं जात आहे. पुतीन यांची मुलगी असल्याबद्दल तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून,लोक तिला डॉटर ऑफ द डेव्हिल म्हणजे 'सैतानाची मुलगी' (Daughter of Devil) म्हणत आहेत. लुईझा रोसोवा (Louisa Rosova) ही रशियातील एका मोठ्या बँकेची मालक असलेल्या 45 वर्षीय स्वेतलाना क्रिव्होनोगिख यांची मुलगी आहे. ती 3.1 दशलक्ष पौंड म्हणजे सुमारे 31कोटीच्या संपत्तीची मालकीण आहे. लुईझा ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि स्वेतलाना यांची मुलगी आहे, असं म्हटलं जातं. मात्र, पुतीन यांनी कधीच याची जाहीर कबुली दिलेली नाही. पुतीन यांना क्रेमलिनच्या माजी फर्स्ट लेडी आणि माजी पत्नी ल्युडमिला यांच्यापासून दोन मुली आहेत. झी न्यूजने याविषयी वृत्त दिलं आहे. हे वाचा-युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून अंगावर येईल काटा! लुईझा सेंट पीटर्सबर्गमध्ये शिक्षण घेत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) लुईझाचे 84 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, मात्र गेल्या 5 महिन्यांपासून तिनं सार्वजनिक पोस्ट करणे बंद केले आहे. त्यामुळं पुतीन यांनी तिचा आवाज बंद केला असावा असा संशय निर्माण झाला आहे. अशा या लुईझावर इन्स्टाग्रामवर अनेक अपमानास्पद कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तु उंदरासारखी बिळात का लपून बसली आहेस? 'तू एका खूनी, युद्ध गुन्हेगार, मनोरुग्ण आणि व्यसनी माणसाची मुलगी आहेस, अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. अनेक कमेंट्समध्ये युक्रेनियन निळा, पिवळा ध्वज शेअर करण्यात आला असून, रशियाच्या या हुकूमशहाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं म्हटलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात लोक लुईझावर टीका करत असताना दुसरीकडे काही लोक तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तरुणपणी पुतीन जसे दिसत होते तशी लुईझा दिसत असल्यानं तिला पुतीन यांची मुलगी समजलं जात असल्याचा काही लोकांचा विश्वास आहे. अशापैकी काही लोकांनी तिची बाजू घेतली आहे. लोकांनी विनाकारण तिला दोष देऊ नये, यात तिची काहीही चूक नाही, असं एकानं म्हटलं आहे. तर एकानं म्हटलं आहे की, बाप वेडा असेल तर ती काहीही करू शकत नाही. 'ती एक माणूस आहे, ती गुन्हेगार नाही,' असंही एकानं म्हटलं आहे. एकाने 'ती निर्दोष आहे, ती सैतानाची मुलगी आहे, असे लिहिणे थांबवा! अशी कमेंट केली आहे. हे वाचा-Breaking News:खार्किवमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियानं घेतला मोठा निर्णय त्याच वेळी, एकाने टिप्पणी केली आहे की, 'ती संगनमतासाठी दोषी आहे. हे नाझी काळातील जर्मन लोकांसारखेच आहे.' 'तुमच्यावर त्याचे प्रेम असेल, तर तुम्ही लोकांना मारणे चुकीचे असल्याचे पटवून देऊ शकता,' अशी कमेंट एकाने केली आहे. 'तिचे वडील जे काही करत आहेत त्याच्याशी ती सहमत नाही, हे तरी ती सांगू शकते आणि एक प्रकारे त्याच्यावर प्रभाव टाकू शकते,' असंही एकानं लिहिलं आहे. 'पुतीनसाठी, त्यांच्या मुली महत्त्वाच्या असू शकतात. तरीही ती गप्प आहे, कारण तिला माहित आहे की तिने डॅडीविषयी एक वाईट शब्द जरी उच्चारला तरी तिला पैसा, अपार्टमेंट आणि अनेक महागड्या गोष्टींपासून वंचित राहावे लागेल. साहजिकच तिच्यासाठी मानवी जीवनापेक्षा पर्स आणि व्हिला जास्त महत्त्वाचा आहे', अशी खरमरीत टीकाही काही लोकांनी केली आहे.
First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin

पुढील बातम्या