मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तुर्कीतील भूकंपबळींची संख्या 20 हजारांवर पोहोचेल, WHOने व्यक्त केली भीती

तुर्कीतील भूकंपबळींची संख्या 20 हजारांवर पोहोचेल, WHOने व्यक्त केली भीती

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, दुर्दैवाने आम्ही प्रत्येकवेळी भूकंपात एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे सुरुवातीला येणारे मृत्यू आणि जखमींचे आकडे पुढच्या आठवड्यात वेगाने वाढतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अंकारा, 07 फेब्रुवारी : तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे मोठी जिवितहानी झालीय. आतापर्यंत ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं भूकंपामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ८ पट वाढू शकतो असं म्हटलं आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे केंद्र गांजियांतेप शहराजवळ होतं. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती.

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, दुर्दैवाने आम्ही प्रत्येकवेळी भूकंपात एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे सुरुवातीला येणारे मृत्यू आणि जखमींचे आकडे पुढच्या आठवड्यात वेगाने वाढतात. याशिवाय थंडीमुळे अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. अनेक लोक बेघर होऊ शकतात.

हेही वाचा : भूकंपवाला नॉस्रेदमस! 3 दिवस आधीच केली होती तुर्कीच्या भूकंपाची भविष्यवाणी

भूकंपानंतर मोठ्या प्रमाणावर जगभरातून वेगवेगळ्या देशांकडून तुर्कीला मदत केली जात आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटेनं बचावकार्यात येऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्यांबाबत इशारा दिला आहे. गार्डियने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने भूकंपात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २० हजारांपेक्षा जास्त होऊ शकते असं म्हटलंय. जेव्हा WHO ने ही भीती व्यक्त केली तेव्हा मृतांची संख्या अडीच हजार होती. तर आता ती ४ हजारांवर पोहोचली आहे.

तुर्की आणि सीरियात हजारो इमारती भूकंपाच्या धक्क्याने कोसळल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. सोशल मीडियावर तुर्कीतले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात विध्वंसक चित्र दिसत आहे. अनेक रस्ते खचले असून मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

First published:

Tags: Earthquake, Turkey