मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

रशियाची कोरोना लस किती सुरक्षित? WHO ने दिली महत्त्वाची माहिती

रशियाची कोरोना लस किती सुरक्षित? WHO ने दिली महत्त्वाची माहिती

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात व्यापक स्तरावर कोरोना लस (Corona vaccine) दिली जाणार असल्याची घोषणा रशियाने (Russia) केली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात व्यापक स्तरावर कोरोना लस (Corona vaccine) दिली जाणार असल्याची घोषणा रशियाने (Russia) केली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात व्यापक स्तरावर कोरोना लस (Corona vaccine) दिली जाणार असल्याची घोषणा रशियाने (Russia) केली आहे.

    पॅरिस, 05 ऑगस्ट : कोरोना लशीची (Corona vaccine) प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. अशात रशियाने (Russia) आपल्या कोरोना लशीचे (Covid-19 Vaccine) सर्व क्लिनिकल ट्रायल संपल्याची घोषणा केली आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं आहे. ही आनंदाची बातमी आहे मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) या लशीच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रशियाने लस बनवण्यासाठी गाइडलाइन्सचं पालन केलेलं नाही, त्यामुळे लशीच्या यशस्वीतेवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. रशियाने कोरोना लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल केलेलं नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल न करताच त्याच्या उत्पादनासाठी परवाना दिला जात असेल तर हे धोकादायक ठरू शकतं, असं WHO च्या प्रवक्त्या क्रिस्ट्रियन लिंडमियर (Christian Lindmeier) यांनी यूएन पत्रकार परिषदेत सांगतिलं. हे वाचा - 45 वयाच्या व्यक्तींसाठी जास्त धोकादायक ठरतोय कोरोना; डॉक्टरांनी सांगितली कारणं क्रिस्टियन लिंडमियर म्हणाल्या, "अनेकदा काही संशोधक दावा करतात की त्यांनी नवा शोध लावला आहे आणि ही चांगली बातमी असते. जेव्हा अशा लशींबाबत बातम्या येतील किंवा अशी पावलं उचलली जातील तेव्हा आपल्याला सावध राहायला हवं. अशा बातम्यांबाबत तथ्यता पडताळून घ्यायला हवी. एखादा शोध लावणं किंवा लस परिणामकारक असल्याचे संकेत मिळणं आणि क्लिनिकल ट्रायलच्या सर्व टप्प्यांमधून जाणं यामध्ये खूप मोठा फरक आहेत. आम्हाला अधिकृतरित्या असं काहीच दिसलं नाही. तर अधिकृतरित्या असं काही झालं असतं तर युरोपमधील आमच्या सदस्यांनी याकडे जरूर लक्ष दिलं असतं" "एक सुरक्षित लस तयार करण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत आणि याबाबत गाइडलाइन्सदेखील आहेत. याचं पालन करणं गरजेचं आहे जेणेकरून लस किंवा कोणताही उपचार किती परिणामकारक आहे आणि कोणत्या आजाराविरोधात लढण्यात मदत करू शकेल हे आपल्याला समजू शकेल. गाइडलाइन्सचं पालन केल्यानं आपल्याला एखादा उपचार किंवा लशीचे दुष्परिणा काय आहेत तेदेखील समजतं" हे वाचा - पाण्याच्या बॉटल पेक्षाही कमी दरात मिळणार COVAXIN लस! जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या वेबसाइटवर क्लिनिक ट्रायल सुरू असलेल्या 25 लशींची यादी तयार केली आहे. आतापक्यंत 139 लशी प्री-क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Russia, Who

    पुढील बातम्या