अंकारा, 18 मे : हॉलिवूड फिल्म टायटॅनिक कुणाच्या लक्षात राहणार नाही. सत्य घटनेवर आधारित ही फिल्म. या फिल्मधील रोमँटिक सीन्सने कित्येकांच्या मनात आजही घर केलं आहे. या फिल्ममधील हिरो-हिरोईन जॅक आणि रोझ यांनी जहाजावर उभं राहून एकमेकांसोबत दिलेली रोमँटिक पोझ आजही कितीतरी कपलही देताना दिसतात. याच टायटॅनिक पोझच्या नादात त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. टायटॅनिकचा तो सीन रिक्रिएट करताना या कपलसोबतही तीच ट्रॅजिडी झाली जी जॅक-रोझसोबत झाली
(While recreate titanic pose lover drowned in sea).
तुर्कस्तानाच्या कोकेली प्रांतातील ही घटना आहे. इजमित मरीना पिअरमध्ये समुद्रावर फुरकान सिफ्टसी आणि माइन दिनार हे प्रेमीयुगुल टायटॅनिकची रोमँटिक पोझ किंग ऑफ द वर्ल्ड रिक्रेएट करत होते. त्यावेळी दोघांचाही तोल गेला आणि दोघं समुद्रात कोसळले.
पोझ देण्याआधी हे कपल फिशिंग करत होतं. त्यावेळी ते दारूही पित होते. त्यानंतर ते उभे राहून टायटॅनिकची पोझ द्यायला गेले आणि त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही. नशेत त्यांचा तोल जाऊन दे समुद्रात पडले.
हे वाचा - ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा प्रेग्नंट झाली महिला
तिथंल्या मच्छिमारांनी त्यांना समुद्रात कोसळताना पाहिलं आणि त्यांच्या मदतीसाठी धावले. तरुणीला वाचवण्यात मच्छिमारांना यश मिळालं. पण तरुण कुठे सापडला नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर खोल समुद्रातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

टायटॅनिक फिल्ममध्ये ज्याप्रमाणे शेवटी जॅकचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आणि रोझ वाचली. अगदी तसंच इथंही फुरकानचा समुद्रात मृत्यू झाला आणि माइन मृत्यूच्या दारातून परत आली. रुग्णालयात दाखल असेलली माइन शुद्धीवर आल्यावर तिने ही सर्व घटना सांगितली. ही घटना 15 एप्रिल रात्री 9.15 वाजता ही घटना घडली आहे.
हे वाचा - Honeymoon Trip चं गिफ्ट पडलं भारी; हनीमून सोडून पळालं कपल कारण...
अशा किती तरी फिल्म आहेत. ज्यातील रोमँटिक सीन रिक्रेएट करण्याचा प्रयत्न काही कपल करतात. असे काही सीन असतात जे जीवावर बेतण्याची शक्यता असते. फिल्ममध्ये हे सीन शूट करताना सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतलेली असते. त्यामुळे फक्त फिल्ममध्ये पाहून सोपे वाटले म्हणून असे सीन करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.