त्याने तात्काळ बचाव पथकाला बोलावलं. यानंतर सापाला जिवंत पकडून त्याच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार, सुदैवाने साप विषारी नव्हता. पण डॉक्टरांनी त्याला टेटनसचं इंजेक्शन दिलं. दोन आठवड्यांनंतर डॉक्टरांनी सापाच्या दातांचे तुकडे त्याच्या मागील भागात सापडले. हे वाचा - Shocking Video - मिठी मारत थेट मगरीलाच किस करायला गेला तरुण; धक्कादायक शेवट त्याने याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहेत. सापाचे फोटो त्याने ट्विटरवर ट्विट केले आहेत. द स्टारशी बोलतान साबरीने सांगितलं, अद्यापही त्या घटनेने माझ्या मनात भीतीने घऱ केलं आहे. दोन आठवडे तो आपल्या टॉयलेटमध्ये गेला नाही. टॉयलेटमध्ये सापाने दंश केल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. अशी वेळ कुणावर येऊ नये, पण आलीच म्हणजे सापाने हल्ला केलाच तर नेमकं काय करावं याचीही माहिती तुम्हाला असलेली चांगली. साप चावल्यास काय करावं? जर तुम्हाला सापाने दंश केलं असेल तर ज्या ठिकाणी उभे आहात तिथेच थांबा. अजिबात चालू नका. कारण चालल्याने विष पटकन शरिरात पसरतं. जिथे सापाने दंश केला तिथला भाग घट्ट बांधा, ज्यामुळे विष वर शरीरात चढणार नाही. तात्काळ रुग्णालयात जावं.Dua bulan lepas bontot aku kena gigit dengan ular time aku berak. Ular tu keluar dari lubang jamban. Nasib dia tak gigit telur aku. pic.twitter.com/ABDjDkSe2Q
— Sabri Bey (@sabritazali) May 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.