S M L

VIDEO : नाचताना कंबरेला खोचलेली बंदूक पडली अन् गोळी सुटली

अमेरिकेच्या डेनवरमध्ये एका धम्माल कार्यक्रमात असा काही प्रकार घडला की तिथलं वातावरण एखाद्या दंगलीप्रमाणे झालं. जेव्हा...

Renuka Dhaybar | Updated On: Jun 4, 2018 08:29 PM IST

VIDEO : नाचताना कंबरेला खोचलेली बंदूक पडली अन् गोळी सुटली

अमेरिका, ता. 04 जून : अमेरिकेच्या डेनवरमध्ये एका धम्माल कार्यक्रमात असा काही प्रकार घडला की तिथलं वातावरण एखाद्या दंगलीप्रमाणे झालं. जेव्हा डान्स फ्लोअरवर डान्स करताना एका व्यक्तिची बंदूक खाली पडली. ती बंदुक उचलताना गोळी झाडली गेली आणि तिथे उभं असणाऱ्या एका बार टेंडरला जाऊन लागली. हा प्रकार इतक्या झटपट घडला की, तिथे सगळ्यांची धावपळ सुरू झाली.

डेनवरच्या माइल हाई बारमध्ये पार्टी सुरू असताना, डान्स फ्लोअरवर हटके डान्स करून एका व्यक्तीने सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे ओढून घेतलं. अनेक जण त्याच्या डान्सचा व्हिडिओही काढत होते. असाच डान्स करताना त्या व्यक्तीने बॅक फ्लिप मारली आणि त्याच्या खिशातून त्याची बंदूक खाली पडली. घाईघाईत तो ती उचलायला गेला पण त्यातून चुकून गोळी झाडली गेली.

त्या व्यक्तिच्या बंदूकीतून निघालेली ती गोळी थेट समोर उभं असलेल्या बार कर्मताऱ्याला जाऊन लागली. गोळी लागल्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.


डेनवर पोलिसांच्या मते गोळी झाडलेला व्यक्ती एफबीआयचा एजंट आहे. पण तो ड्यूटीवर नसल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 06:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close