Home /News /videsh /

भारताने केलेल्या एअर बबल करारामुळे कोणत्या देशांत प्रवास करणं शक्य? वाचा सविस्तर

भारताने केलेल्या एअर बबल करारामुळे कोणत्या देशांत प्रवास करणं शक्य? वाचा सविस्तर

या कराराअंतर्गत भारतातून अमेरिकेला कोण जाऊ शकतं?

  नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता हळूहळू सर्व सेवा खुल्या होत आहेत. तसंच जगातील विविध देशांत विमान मार्गे जाता यावं यासाठी हवाई वाहतूकही सुरू करण्यात येत आहे. भारताने 16 देशांशी एअर बबल द्विपक्षीय करार केला असून त्याअंतर्गत भारतीय नागरिक या देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करू  शकतात. भारतानी याआधीच अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी या देशांशी एअर बबल करार केला असून आता ओमान, भूतानसारख्या देशांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती. सरकार इटली, बांगलादेश, कझाकिस्तान, युक्रेन आणि इतर देशांशीही एअर बबल कराराबाबत बोलणी करत असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं. कोविडमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळे कोणत्याही देशात व्यावसायिक किंवा प्रवासी हवाई वाहतूक करण्यासाठी दुहेरी पद्धतीचा करार करावा लागतो. त्याला एअर बबल करार म्हणतात. बंदी असतानाही परदेशांत अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी आपली विमानं पाठवणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. भारताने वंदे भारत अभियानाअंतर्गत 6 मेपासून 17 लाख 11 हजार 128 नागरिकांना मायदेशी आणलं असून 2 लाख 97 हजार 536 जण भारतातून बाहेर गेले आहेत, अशी माहिती पुरी यांनी दिली. लॉकडाउन शिथिल करण्याच्या हेतूने व्यवसाय, शिक्षण किंवा पर्यटनासाठीही भारतात येणाऱ्या किंवा परदेशी जाणाऱ्या लोकांना सहज प्रवास करता यावा म्हणून एअर बबल करार केले जात आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या SOP पाळून ही हवाई वाहतूक केली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करू इच्छिणारे प्रवासी खालील मुद्दयांवर दृष्टिक्षेप टाकू शकतात. हे ही वाचा-Tiktok चा नाद जिवावर उठला! अतरंगी VIDEO करताना स्वतःवरच केलं शूट एअर बबल कराराअंतर्गत तुम्ही कोणत्या देशांत जाऊ शकता? भारताने खाली दिलेल्या 16 देशांसोबत एअर बबल करार केला आहे त्यामुळे त्या देशांमध्ये तुम्ही जाऊ शकता. हे देश असे: फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, मालदीव, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीन, नायजेरिया, इराक, अफगाणिस्तान, जपान, केनिया, भूटान, ओमान. एअर बबल काय आहे? कोविडच्या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद असताना दोन देशांमध्ये व्यावसायिक हवाई सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपासाठी केलेल्या कराराला एअर बबल करार म्हणतात. या करारामुळे दोन्ही देशांतील हवाई सेवा वाहतूक करतात. वंदे भारत मिशनमध्ये केवळ भारतीय विमानं त्या देशात जाऊ शकत होती. वंदे भारत मिशन आणि एअर बबल करारात फरक काय? एअर बबल द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देशांतील नागरिक सरकारकडे किंवा राजदूतवासात नोंदणी न करता मोकळेपणाने हवाई प्रवास करू शकतात. वंदे भारत मिशन अंतर्गत एखाद्या व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर भारतीय दूतावासात नाव नोंदणी करणं अनिवार्य होतं. एअर बबलमध्ये दोन्ही देशांतून विमानं उपलब्ध असल्याने प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध असतील आणि तिकिटांचे दरही कमी होतील. वंदे भारत मिशनमध्ये ज्या देशांनी हवाई वाहतूक बंद केली आहे अशा देशांत भारतीय विमानं जात होती. हे ही वाचा-जगभरात Corona चं संकट असताना चिनी नागरिक लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद, पाहा PHOTO या एअर बबल योजनेत टुरिस्ट व्हिसाधारकांना परवानगी आहे का? हो, दुबई, बहारीन, अफगाणिस्तान यांनी काही बंधन पाळून प्रवाशांना त्यांच्या देशांत येण्याची परवानगी दिली आहे. तरीही आतापर्यंत बहुतांश विमानांतून परदेशांत अडकलेले भारतीय नागरिक, ओसीआय कार्डधारक आणि मुत्सद्यांनाच आणलं आहे. ज्या देशांनी टुरिस्ट व्हिसा दिला आहे अशा देशांत तुम्ही जाऊ शकता पण जिथं परवानगी नाही तिथं तुम्हाला त्या देशाचा व्हिसा असेल तर जाता येईल. एअर बबल करारात आणखी देशांचा समावेश केला जाणार आहे का? केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले, ‘सरकार इटली, बांगलादेश, कझाकस्तान, युक्रेन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड या देशांशीही एअर बबल कराराबाबत बोलणी करत आहे.’ एअर बबल देशांमध्ये जाताना काही निर्बंध आहेत का? हो,सगळ्या देशांनी सगळ्या प्रकारचे व्हिसा दिलेले नाहीत. एअर बबल अंतर्गत तुम्हाला एवढीच सूट मिळणार आहे की तुम्हाला दुतावासात नोंदणी करण्याची गरज नाही. ज्या देशात जायचंय त्या देशात जाण्यासाठी कोविडपूर्वी ज्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती ती करावी लागणारच आहे. त्याचबरोबर त्या देशांचे नियमही लागू असतील. उदाहरणार्थ टुरिस्ट व्हिसा असलेल्या प्रवाशांना अजून भारतात येण्यास परवानगी नाही. भारतातून अमेरिकेला कोण जाऊ शकतं?
  1. अमेरिकी नागरिक, पर्मनंट रेसिडंट, आणि अमेरिकेचा वैध व्हिसा असणारे परदेशी नागरिक.
  2. अमेरिकेचा कोणताही वैध व्हिसा असलेली व्यक्ती. त्या व्हिसाधारकाला अमेरिकेत प्रवेशास बंदी आहे की नाही याची खात्री करून घेण्याची जबाबदारी त्या एअरलाइनवर असून त्यांनी भारतील नागरिकाला तिकिट किंवा बोर्डिंग पास देण्यापूर्वी याची खातरजमा करणं गरजेचं आहे.
  3. परदेशी नाविक; भारतीय जहाजबांधणी मंत्रालयाने परवागी दिलेले भारतीय पासपोर्ट असलेले नाविकही अमेरिकेला जाऊ शकतात.
  भारतातून युएईला कोण जाऊ शकतं?
  1. UAEचे नागरिक
  2. ICA प्रमाणित UAE चे रहिवासी पण त्यांना केवळ UAE ला जाता येईल.
  3. युएईचा कोणताही वैध व्हिसा असलेली आणि केवळ युएईलाच जाणारी व्यक्ती. त्या व्हिसाधारकाला युएईत प्रवेशास बंदी आहे की नाही याची खात्री करून घेण्याची जबाबदारी त्या एअरलाइनवर असून त्यांनी भारतील नागरिकाला तिकिट किंवा बोर्डिंग पास देण्यापूर्वी याची खातरजमा करणं गरजेचं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  पुढील बातम्या