Home /News /videsh /

सत्तेवर येताच तालिबाननं प्रमुख नेत्यांना संपवलं? दोन्ही उच्च नेते गायब असल्यानं चर्चांना उधाण

सत्तेवर येताच तालिबाननं प्रमुख नेत्यांना संपवलं? दोन्ही उच्च नेते गायब असल्यानं चर्चांना उधाण

Afghanistan Crisis: तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्लाह अखुंदजादा (Mullah Haibatullah Akhundzada) आणि सध्याच्या सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादार (Mullah Abdul Ghani Baradar) हे दोन्ही नेते मागील काही दिवसांपासून गायब आहेत.

पुढे वाचा ...
    काबूल, 15 सप्टेंबर: अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं स्वत:चं सरकार (Taliban Government) स्थापन केलं आहे. पंतप्रधानांसह अन्य पदांवर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. पण तालिबान संघटनेचे दोन वरिष्ठ नेते 'गायब' झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरं तर, तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्लाह अखुंदझादा (Mullah Haibatullah Akhundzada) आणि सध्याच्या सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादार (Mullah Abdul Ghani Baradar) हे दोघं मागील काही दिवसांपासून गायब असून सार्वजनिक ठिकाणी त्यांना कुणीही पाहिलं नाही. त्यामुळे हे नेते नेमके कुठे आहेत. त्यांच्यासोबत काही घातपात झाला का ? अशा चर्चांना उधाण आलं आहे. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवल्यापासून सर्वोच्च नेता हैबतुल्लाह अखुंदझादा गायब आहे. मात्र, नवीन सरकारच्या घोषणेनंतर अखुंदझादाच्या वतीने जाहीर निवेदन जारी करण्यात आलं होतं. तालिबानकडून असंही सांगण्यात येत आहे की, अखुंदझादा लवकरच सार्वजनिक पद्धतीनं लोकांसमोर हजर होणार आहेत. याची माहिती तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. पण आत्तापर्यंत हा क्षण अद्याप आला नाही. त्यामुळे संशय वाढत चालला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अखुंदझादा यांचा एकमेव फोटो उपलब्ध आहे. हेही वाचा-अफगाणिस्तानमध्ये जीवघेणी गरिबी, वाट्टेल ते विकून नागरिक भरतायत पोट, पाहा PHOTOs बरदार कुठे आहेत? याशिवाय, तालिबान सरकारमधील उपपंतप्रधान असणारे मुल्ला गनी बरादार यांच्याबद्दल विविध अफवा पसरवल्या जात आहेत. ते एकतर मारले गेले असावेत किंवा गंभीररित्या जखमी झाले असावेत, असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बरादार आणि हक्कानी गटांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पंजशीर प्रकरणासंबंधित मतभेद झाल्यामुळे हा संघर्ष घडल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तालिबाननं  संबंधित बातम्या निराधार असल्याचं म्हटलं होतं. हेही वाचा-अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार कठीण दुसरीकडे मुल्ला बरादार यांनी एक ऑडिओ संदेश जारी करत आपण तंदुरुस्त असल्याची घोषणा केली होती. तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी मुल्ला अब्दुल गनी बरादार यांचा ऑडिओ संदेश सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. संबंधित संदेशात मुल्ला बरादार म्हणाले होते की, ते जिवंत असून एकदम ठणठणीत आहेत. बरादारचं सार्वजनिक उपस्थितीतून गायब होणं आणि व्हिडीओऐवजी ऑडिओ संदेश जारी संशयास्पद असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय मीडियात सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या