• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • Joe biden अडकले होते तुफानी बर्फवृष्टीत; या अफगाणी माणसाने वाचवला होता जीव

Joe biden अडकले होते तुफानी बर्फवृष्टीत; या अफगाणी माणसाने वाचवला होता जीव

त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी तो अमेरिका आणि राष्ट्रपती बायडेन यांना मदत मागत होता. मात्र, व्हाईट हाऊसने त्याची मागणी ऐकली नाही

  • Share this:
वॉशिंग्टन, 12 ऑक्टोबर: अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्यासोबत अनुवादक (Translator) म्हणून काम करणाऱ्या अमान खलीली (Aman Khalili left kabul) या व्यक्तीने अखेर काबूल सोडले आहे. अमेरिकेतील परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (America Ministry of Foreign affairs) या माहितीला दुजोरा दिला. अमान खलीली हा केवळ एक अनुवादक असला, तरी त्याबाबत थेट मंत्रालयाने माहिती देण्याचे कारण इतिहासात दडले आहे. याच अमानने 13 वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (President Joe Biden) यांचा जीव वाचवला होता. ही घटना 2008 साली घडली होती. जो बायडेन हे तेव्हा डेलावेअरचे सिनेटर (Senator Joe Biden) होते. सिनेटर जॉन केरी, चक हेगल आणि बायडेन हे तिघे त्यावेळी अफगाण दौऱ्यावर (Biden 2008 Afghan visit) आले होते. माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवावर का घसरले मोदी समर्थक? काय घडलं नेमकं? यावेळी बगराम हवाई अड्ड्यापासून सुमारे 20 मैल दूर एक हिमवादळ (Biden stuck in snow storm) आले होते. या वादळामुळे तीन सिनेटरना घेऊन जाणाऱ्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे पंख अडकल्यामुळे, त्यांना आपत्कालीन लँडिंग (Biden Afghan snow storm) करावं लागलं. या वेळी बगरामहून त्यांच्यासाठी मदत पाठवण्यात आली होती. या बचाव पथकामध्ये मोहम्मद अमान खलीलीदेखील (Mohd Aman Khalili) सहभागी होता. या पथकाला हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कित्येक तास गाडी चालवावी लागली होती. खलीलीच्या मदतीला विसरले बायडेन यावर्षी 15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तान (Taliban takes over Afghanistan) देशावर ताबा मिळवला. यानंतर अफगाणिस्तानातील कित्येक रहिवाशांनी देश सोडून पळून जाण्याचा पर्याय स्वीकारला होता. यामध्ये काहींना यश आले, तर कित्येकांना ते शक्य झाले नाही. खलीलीनेही आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना अमेरिकेचा व्हिसा (Khalili asks for US VIsa) मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा अर्ज फेटाळला गेला. पाकिस्तानची अण्वस्त्रे जगासाठी ठरतायेत मोठी डोकेदुखी; ही आहेत कारणं यानंतर काही दिवसांपूर्वीच वॉल स्ट्रीट जर्नलला (Wall street journal interview with Khalili) दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहम्मद अमान खलीलीने सांगितलं की त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी तो अमेरिका आणि राष्ट्रपती बायडेन यांना मदत मागत होता. मात्र, व्हाईट हाऊसने त्याची मागणी ऐकली नाही. उलट व्हाईट हाऊसने (White House on Khalili) यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, व्हाईट हाऊसमधील एक प्रतिनिधी तेथील परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना अमेरिकेने अफगाणी नागरिकांना दिलेल्या वचनाची आठवण करून देत होता. तरीही व्हाईट हाऊसने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. अमेरिकेने आपले सैन्य मागे घेताच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर अमेरिकेने सफाईदारपणे आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानामधून बाहेर काढले होते. त्यानंतर अमेरिका अफगाणिस्तानमधील लोकांची मदत करत राहील, असे वक्तव्य अँटनी यांनी केलं होते. यासोबतच, स्थानिकांना अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची परवानगी देण्याच्या तालिबानच्या वचनाची पूर्तता करण्यासही अमेरिका मदत करेल असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, खलीलीच्या उदाहरणावरून असं काहीही होत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
First published: