Home /News /videsh /

Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा

Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा

Pakistan approves Chemical Castration of Rapists: केमिकल कॅस्ट्रेशनमध्ये पुरुषाची कामवासना कमी केली जाते आणि रसायनांद्वारे त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन संप्रेरक कमी केलं जातं. हे संप्रेरक पुरुषांमधील मुख्य लैंगिक हार्मोन असतं. 1940 च्या दशकापासून लैंगिक गुन्हेगारांविरुद्ध शिक्षा म्हणून या प्रकारच्या कॅस्ट्रेशनचा वापर केला जात आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 19 नोव्हेंबर : पाकिस्तानच्या संसदेने असा कायदा संमत केला आहे, ज्यामुळे न्यायालयांना बलात्काऱ्यांना (Rapist) नपुंसक बनवण्यासाठी शिक्षा करता येईल. बुधवारी मंजूर झालेल्या कायद्यानुसार, पाकिस्तानमध्ये वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्यांमध्ये पकडल्या गेलेल्यांना दोषींना आता केमिकल कॅस्ट्रेशनची  (Chemical Castration)  शिक्षा दिली जाईल. सरकारने हे विधेयक वर्षभरापूर्वी आणले होते. शिक्षेसाठी एक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत सरकारी संस्थांना लैंगिक शोषण करणाऱ्या आणि बलात्कार करणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. मात्र, मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकिलांनी या शिक्षेला अमानवी म्हटलं आहे. न्यायालयांना चार महिन्यात खटल्याची सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे काय आणि ही शिक्षा कशी दिली जाते ते जाणून घेऊया - केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे काय? केमिकल कॅस्ट्रेशनमध्ये पुरुषाची कामवासना कमी केली जाते आणि रसायनांद्वारे त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन संप्रेरक कमी केलं जातं. हे संप्रेरक पुरुषांमधील मुख्य लैंगिक हार्मोन असतं. 1940 च्या दशकापासून लैंगिक गुन्हेगारांविरुद्ध शिक्षा म्हणून या प्रकारच्या कॅस्ट्रेशनचा वापर केला जात आहे. 2003 मध्ये, संशोधक चार्ल्स एल. स्कॉट आणि ट्रेंट होमबर्ग म्हणाले, 'पुरुषांमधील मानसिक लैंगिक वर्तन कमी करण्यासाठी संप्रेरक-आधारित औषधांचा वापर 1944 मध्ये प्रथम उल्लेखला गेला आहे.' विधेयकात म्हटले आहे - 'केमिकल कॅस्ट्रेशन ही पंतप्रधानांनी बनवलेल्या नियमांनुसार मंजूर केलेली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर लैंगिक संबंध ठेवण्यास अक्षम केले जाते, ज्यासाठी न्यायालय ड्रग्सच्या वापराचे आदेश वैद्यकीय मंडळाला देईल. कोणते रसायन वापरले जाते? सायप्रोटेरोन एसीटेट (सीपीए), मेड्रोक्सीप्रोजेस्टेरॉन एसीटेट (एमपीए) आणि एलएचआरएच सारखी औषधे रासायनिक कास्ट्रेशन अंतर्गत वापरली जातात. ही औषधे टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रॅडिओल हार्मोन्स कमी करतात. हे हार्मोन्स पुरुषांच्या कामवासनेसाठी जबाबदार असतात. MPA यूएसमध्ये रासायनिक कॅस्ट्रेशनसाठी वापरले जाते, तर CPA यूके, कॅनडा आणि मध्य पूर्वमध्ये वापरले जाते. केमिकल कॅस्ट्रेशन किती प्रभावी आहे? जर आपण वैद्यकीय परिणामांबद्दल बोलायचे झाल्यास, केमिकल कॅस्ट्रेशनमुळे हाडे कमकुवत होतात. रक्त कमी होणे, स्नायू कमकुवत होणे आणि इतर अनेक परिणाम होतात. हे वाचा - Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा – सरकार तीनही कृषी कायदे मागे घेणार, वाचा 5 ठळक मुद्दे ही शिक्षा यांनाही दिली होती आधुनिक संगणनाचे जनक आणि महान गणितज्ञ, अॅलन ट्युरिंग यांना 1952 मध्ये समलैंगिकतेची शिक्षा म्हणून केमिकल कॅस्ट्रेशनची शिक्षा करण्यात आली होती. एका संशोधनात असे म्हटले आहे की, केमिकल कॅस्ट्रेशनच्या अंमलबजावणीनंतर 5 ते 40 टक्के रीऑफंडिंग दरात घट झाली आहे. जगातील इतर देश देखील हेच सांगतात. परंतु, याचा नक्की किती प्रभाव होतो याबाबत वाद-विवाद आहेत. याबाबत भारतातही चर्चा रंगली होती भारतात लैंगिक गुन्ह्यांसाठी शिक्षा म्हणून कॅस्ट्रेशनचा हा प्रकार 2012 च्या दिल्ली गँगरेप आणि खून प्रकरणापासून चर्चेत आला आहे. कायदेशीर परिणामांबद्दल बोलताना ज्येष्ठ वकील आभा सिंह यांनी भास्करला दिलेल्या माहितीत सांगितले की, हा प्रकार फारसा प्रभावी नाही. याची मात्रा ठराविक कालावधीनंतर द्यावी लागते. ज्या देशांमध्ये ते वापरले जात आहे तेथे ते फारसे प्रभावी नाही, परंतु तरीही काहीही न करण्यापेक्षा काहीतरी असणं चांगलं आहे. हे वाचा - “भाऊ-भाऊ म्हणून एकत्र लढले पण निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपने जे केलं ते…” : विक्रम गोखले दरम्यान, कट्टर इस्लामी गटांकडून बलात्कार करणार्‍यांना नपुंसक बनवण्याच्या तरतुदीला विरोध केला जात आहे. जमात-ए-इस्लामी पक्षाचे सिनेटर मुश्ताक अहमद यांनी हे विधेयक इस्लामविरोधी आणि शरियाविरोधी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, बलात्कार करणाऱ्याला जाहीर फाशी दिली पाहिजे. पण शरियामध्ये अशा पद्धतीचा कुठंही उल्लेख नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pakisatan, Rape case

    पुढील बातम्या