पॅरिस, 19 डिसेंबर : महिलांचं कामाच्या ठिकाणी (workplaces) प्रमाण वाढावं यासाठी अनेक प्रयत्न होत असल्याचं आपण पाहतो. महिलांना समान आणि न्याय्य वेतन मिळावं यासाठीही लढे उभारल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. पॅरिसमध्ये (Paris) मात्र एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे.
पॅरिसच्या न्याय विभागानं पॅरिस सिटी हॉलवर तब्बल 90 हजार युरोंचा दंड लावला आहे. रुपयांच्या एककात हा 80,46,720 इतका आहे. जास्त महिलांना कामावर ठेवल्याचं कारण सांगत हा दंड न्याय विभागानं केला आहे. या महिलांची नियुक्ती 2018 साली करण्यात आली होती. यावर न्याय विभागानं सांगितलं, महिला आणि पुरूषांच्या नियुक्तीत फरक केल्यानं जेंडरचं (लिंगभावविषयक) संतुलन बिघडतं.
2018 साली सिटी हॉल इथं 11 महिला आणि 5 पुरुषांची नियुक्ती केली गेली होती. अशा प्रकारे तिथं महिलांचा टक्का 69 इतका झाला. 2013 साली बनलेल्या कायद्यानुसार ही नियमांची पायमल्ली ठरली. या नियमानुसार, सरकारी विभागात 40 टक्के महिला असतील. मात्र कुठल्याही एका जेंडरचं प्रतिनिधीत्व 60 टक्क्यांहून जास्त नसेल असंही यात सांगितलं गेलं. या प्रकरणात संबंधित नियमाचं उल्लंघन झाल्याचं सांगत न्याय विभागानं दंड लावला.
हे ही वाचा-सुसाइड पॉइंटवरुन महिला घेत होती सेल्फी; हजारो खोल दरीत पाय घसरला आणि...
या प्रकरणावर पॅरिसच्या महिला मेयर एने हिल्डेगो यांच्या मते, पॅरिसच्या सिटी हॉलवर अशा पद्धतीचा दंड लावला जाणं हे अयोग्य आहे. पण त्या अस्वस्थ झाल्या नाहीत. उलट ही बातमी ब्रेक करत त्यांनी सांगितलं, आम्हा महिलांवर असा दंड लागलाय याचा आनंदच आहे.