या आरोपांमुळे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला करावा लागतोय तुरुंगवास

या आरोपांमुळे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला करावा लागतोय तुरुंगवास

रीफ यांना एवेन फील्ड रेसरेन्स प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगी मरियमला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • Share this:

कराची, 13 जुलै : पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना भ्रष्टाचारात दोषी मानण्यात आले आहे. रीफ यांना एवेन फील्ड रेसरेन्स प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगी मरियमला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज शरीफ आणि मरियम लंडनहून पाकिस्तानात यायला रवाना झाले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण

नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात नॅशनल अकाऊंटिबिलीटी ब्यूरो (एनएबी) ने तीन प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमध्ये एवेनफील्ड प्रॉपर्टीज, गल्फ स्टील मिल्स आणि अल- अजीजा स्टील मिल्स प्रकरणाशी निगडीत गुन्ह दाखल आहेत.

एवेनफील्ड प्रॉपर्टीज प्रकरणात एवेनफील्ड अपार्टमेन्टमध्ये शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांचे तीन फ्लॅट होते. या गोष्टीचा खुलासा पनामा पेपरमध्ये झाला होता. शरीफ यांनी ९० च्या दशकात हे फ्लॅट विकत घेतले होते. न्यायालयाने एवेनफिल्ड अपार्टमेन्टवर जप्ती आणण्याचेही आदेश दिले आहेत.

मरियमवर झालेल्या आरोपांनंतर तिने न्यायालयात काही कागदपत्र सादर करुन फ्लॅटची ती फक्त ट्रस्टी असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र मरियमने सादर केलेल्या कागदपत्रावर असलेला टायपिंगचा फॉन्ट हा २००७ नंतर वापरात आला होता. म्हणून ब्रिटीश फॉरेन्सिक एक्सपर्टने ही कागदपत्र खोटी असल्याचे सांगितले.

शरीफ यांची दोन मुलं हुसैन आणि हसन यांच्याशिवाय मुलगी मरियमने परराष्ट्रात कमीत कमी चार कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांमार्फत त्यांनी लंडनमध्ये सहा मोठ्या प्रॉपर्टी विकत घेतल्या होत्या.

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

हे कमी की काय, या प्रॉपर्टी गहाण ठेवून शरिफ कुटुंबियांनी डॉएचे बँकेकडून कमीत कमी ७० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय अजून दोन प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी बँक ऑफ स्कॉटलँडने मदत केली होती.

पनामा पेपर प्रकरणात गेल्यावर्षी नवाज शरीफ यांचे नाव समोर आले होते. यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने शरीफ यांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने शरीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि पंतप्रधान पदासाठी अयोग्य ठरवण्याचा आदेश दिला होता.

यानंतर नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

पाऊस नाही, तरीही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी कारण की...

पनामा पेपर प्रकरणात शरीफ यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांन धारेवर धरण्यास सुरूवात केली. विशेष करुन इम्रान खान यांची पार्टी तहरीक- ए- इंसाफने अनेकदा रस्त्यावर उतरुन नवाज शरीफ यांच्याविरोधात प्रदर्शन केले.

हेही वाचा...

सनी लिओनची ही गुपितं तिच्या बायोपिकमध्येही नाही दाखवणार

विराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 11:54 AM IST

ताज्या बातम्या