Home /News /videsh /

Weird News: मुलाने आईचं असं काढलं चित्र, शेकडो लोकांसमोर शरमली महिला

Weird News: मुलाने आईचं असं काढलं चित्र, शेकडो लोकांसमोर शरमली महिला

ईसाठी (Mother) खूप अभिमानाची बाब असते जेव्हा तिची मुलं (Kids) तिच्यासाठी कार्ड बनवतात किंवा ड्रॉइंग (Drawing) काढतात. मात्र एका आईसाठी त्याच्या मुलाने केलेली पेंटिग शरमेची बाब ठरली आहे.

    Weird News: आईसाठी (Mother) खूप अभिमानाची बाब असते जेव्हा तिची मुलं (Kids) तिच्यासाठी कार्ड बनवतात किंवा ड्रॉइंग (Drawing)  काढतात. मात्र एका आईसाठी त्याच्या मुलाने केलेली पेंटिग शरमेची बाब ठरली आहे. नर्सरीमध्ये शिकणाऱ्या या मुलाने केवळ त्याच्या आईचीच विचित्र ड्राॅइंग काढलं, तर स्कूल असेम्बलीमध्ये ( School Assembly) स्‍टूलवर उभं राहून त्याने ते चित्र संपूर्ण शाळेला दाखवलं. महिलेने सांगितलं की, स्वत:चं तसं चित्र पाहून मी पुरती लाज वाटली. चित्रात महिलेला दाखवलं होतं न्यूड मिरर यूकेमधील एका वृत्तानुसार, निक्की ब्रिटन नावाच्या या महिलेने सांगितलं की, माझ्या लहानग्या पिकासोने माझं असं चित्र काढलं ज्यात त्याने माझे ब्राऊन केस रंगवले होते. माझ्या चेहऱ्यावर मोठं हास्य ठेवलं होतं आणि माझ्या पायात शूज होते. या शूज शिवाय माझ्या शरीरावर एकही कपडा नव्हता. त्याने कपडे रंगवलेच नव्हते. ते चित्र मी खूप उशिरा पाहिलं. चित्रावर कपडे पेन्ट करायला मला वेळच नव्हता. निक्की पुढे म्हणाली की, मला माहीत नाही की, जेव्हा त्याने तो फोटो सर्वांना दाखवला, तेव्हा शिक्षकांच्या डोक्यात काय सुरू असेल. (Weird News A child drew a picture of a mother a woman shy in front of hundreds of people) हे ही वाचा-विकृत आणि निर्दय बाप! 39 दिवसांच्या आपल्याच तान्ह्या बाळाचा केला खून कमीत कमी शूज तरी होते.. निक्कीने जेव्हा हे सर्व सोशल मीडियावर शेअर केलं, तर एका व्यक्तीने लिहिलं की, कमीत कमी तुम्हाला शूज तरी घातले होते, त्यामुळे तुम्ही कपड्यांशिवाय नव्हता. एका अन्य यूजरने लिहिलं की, तुम्हाला तर ते चित्र फ्रेम करायला हवं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: School

    पुढील बातम्या