कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला आम्ही योग्यच वागणूक दिली- पाकिस्तान

कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला आम्ही  योग्यच वागणूक दिली- पाकिस्तान

कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला अत्यंत वाईट वागणूक दिली असल्याचा आरोप भारत सरकारने केला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 29 डिसेंबर: हेर असल्याच्या आरोपाखाली कैदेत  असलेले  कुलभूषण जाधव यांना भेटायला आलेल्या आई आणि पत्नीला आपण योग्यच वागणूक दिली  आहे  असं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे. तसंच त्यांना अत्यंत सन्मानाने आणि आदराने वागवले असल्याची माहितीही पाकिस्तान सरकारने दिली आहे.

कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला अत्यंत वाईट वागणूक दिली असल्याचा आरोप  भारत सरकारने केला आहे. यावर विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी  संसदेत काल पाकिस्तानवर टीका केली आहे.  पाकिस्तानमध्ये गेल्यावर जाधव यांच्या आईला आणि पत्नीला टिकली मंगळसूत्र काढायला लावले. तसंच त्यांचे कपडेही बदलण्यात आले होते. एवढंच काय तर कुलभूषण यांच्या पत्नीचे बूटही परत करण्यात आले नाहीत. तसंच या दोघींना  जाधव यांची गळाभेटही घेता आली नाही.

पण पाकिस्तान सरकारने आपण योग्यच वागणूक दिली असल्याची माहिती दिली आहे.  त्यांचे कपडे बदलणे आणि दागिने काढून घेण्याचं कारण सुरक्षा असं सांगितलं आहे. तसंच कुलभूषण जाधव हे एक दहशतवादी आणि गुप्तहेर असून सुद्धा माणूसकीच्या नात्याने आम्ही अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक दिली असल्याची माहिती   सरकारने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 04:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading