भारतात दहशतवादी हल्ले आम्हीच केले - सय्यद सलाउद्दीन

भारतात दहशतवादी हल्ले आम्हीच केले - सय्यद सलाउद्दीन

सलाउद्दीनने आपल्या मुलाखतीत आपण आजही आंतराष्ट्रीय मार्केटमधून शस्त्र खरेदी करू शकतो. तसंच आजही हिजबुल मुजाहिद्दीनला देशाबाहेरून फंड मिळत असल्याचीही कबुली दिली आहे.

  • Share this:

03 जुलै : अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनचा पहिला व्हिडिओ जाहीर झाला आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सय्यद सलाउद्दीनने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणल्याची  कबुली  दिली आहे.

सलाउद्दीनने आपल्या मुलाखतीत आपण आजही आंतराष्ट्रीय मार्केटमधून शस्त्र खरेदी करू शकतो. तसंच आजही हिजबुल मुजाहिद्दीनला देशाबाहेरून फंड मिळत असल्याचीही कबुली दिली आहे.

मागच्या आठवड्यात अमेरिकेने सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं. जम्मू-काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी आपला सशस्त्र लढा यापुढेही सुरूच राहील असं सलाहुद्दीनने शनिवारी सांगितलं. भारतापासून काश्मीर अलग केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सलाहुद्दीन शनिवारी मुझफ्फराबादमध्ये पत्रकार परिषदेत म्हणाला. मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे.

First published: July 3, 2017, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading