9 तासांची संपूर्ण टिव्ही मालिका पाहा...नाहीतर तुकडे तुकड़े करीन!

9 तासांची संपूर्ण टिव्ही मालिका पाहा...नाहीतर तुकडे तुकड़े करीन!

आपल्याकडे तासन् तास आवडीने टिव्हीवरील मालिका पाहिल्या जातात. येथे मात्र महिलेला टिव्ही मालिका पाहण्यासाठी इतकी जबरदस्ती केली जातेय

  • Share this:

सेडार रेपिड्स, 19 फेब्रुवारी : अमेरिकेतील आयोवा (Iowa) या भागात एक विचित्र घटना घडली आहे. या महिलेने आरोप केला आहे की तिला जबरदस्तीने 9 तास टिव्ही मालिका (Miniseries) पाहायला लावली. इतकचं नाही तर मालिका पाहिली नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली.

सेडार रेपिड्स येथे राहणाऱ्या 52 वर्षीय रॉबर्ट नॉय याच्याविरोधात महिलेने दुर्व्यवहार आणि जबरदस्तीने अटक करण्याचा आरोप केला आहे. जातीयवादासंदर्भातील माझे विचार बदलण्यासाठी नॉय या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, नॉय याने मिनीसीरीज पाहण्यासाठी आपल्यासोबत बसवले. ही मालिका आफ्रिकेतील आपले पूर्वज कुंटा-किन्ते यांना दास बनवण्यापासून ते किन्टेच्या वंशजांची संपूर्ण कथा सांगतात. ही कथा लेखक एलेक्स हेली यांच्या कौटुंबिक इतिहासावर अवलंबून आहे. महिलेच्या डोक्यातील जातीयवादाबाबतचे विचार बदलण्यासाठी आरोपीने अशा विचित्र मार्ग अवलंबला. मात्र यामुळे महिला खूप जास्त अस्वस्थ झाली. तिला जबरदस्तीने 9 तासांची मालिका पाहायला लागली.

जेव्हा महिला मालिका मधूनच सोडून जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा नॉयने महिलेला मालिका पाहण्याची जबरदस्ती केली. जर कुठे गेलात तर जीवे मारेन आणि शरीराचे तुकडे तुकडे करुन फेकून देईल, अशी धमकी देऊन महिलेला मालिका पाहण्याची जबरदस्ती केली. 9 तासांनंतर महिलेने नॉय विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

अन्य बातम्या

विवस्त्र धिंड काढणाऱ्या दलित महिलेला अखेर मिळाला न्याय, नऊजणांना सक्तमजुरी

'बाबा मी जगणार नाही'...लग्नाच्या 9 महिन्यात तरुणीने स्वत:ला संपवलं

आजोबांना सलाम! वयाच्या 93 व्या वर्षी घेतली मास्टर्सची डिग्री, आता तयारी एमफिलची!

First published: February 19, 2020, 12:15 PM IST

ताज्या बातम्या