VIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग

VIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग

ब्रिटेनच्या ब्रिस्टल विमातळावर एका विमानाच्या लँडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय

  • Share this:

15 आॅक्टोबर : ब्रिटेनच्या ब्रिस्टल विमातळावर एका विमानाच्या लँडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. मुसळधार पावसात विमानाच्या पायलटने मोठी हिंमतीने या विमानाचं सुरक्षित लँडिंग केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ १२ आॅक्टोबरचा आहे.

TUI Airways च्या विमानाच्या लँडिंगच्या वेळी पाऊस आणि वादळ वारे सुटले होते. वादळ वाऱ्यात पायलटने मोठी जोखीम पत्कारून विमानाचे सुरक्षित लँडिंग केलंय.

धक्कादायक म्हणजे, विमानाचे जेव्हा लँडिंग करण्यात येत होते तेव्हा विमानाने आपली दिशा बदलली होती. थोडी जरी चूक झाली असती तर मोठा अपघात झाला असता. पण सुरक्षीत लँडिंग करणारा हा पायलट सोशल मीडियावर हिरो ठरलाय. ब्रिटेनमध्ये सध्या कैलम नावाच्या वादळाने हैदोस घातलाय. त्यामुळे विमान वाहतूक सेवेवर परिणाम झालाय.

========================================

First published: October 15, 2018, 10:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading