इंजिनमध्ये स्फोट झाला आणि विमान थेट इमारतींवर कोसळलं; पाकिस्तानच्या भीषण अपघाताचे 10 VIDEO आले समोर

इंजिनमध्ये स्फोट झाला आणि विमान थेट इमारतींवर कोसळलं; पाकिस्तानच्या भीषण अपघाताचे 10 VIDEO आले समोर

  • Share this:

कराची, 22 मे : पाकिस्तान एका भीषण विमान अपघातानं हादरलं. कराची विमानतळाच्या दिशेने निघालेलं हे विमान लँड होण्यापूर्वी काही क्षण शहराच्या निवासी भागातच कोसळलं त्यामुळे हाहाकार उडाला आहे. रस्त्यावर उसळलेली गर्दी आणि इमारतींमागून येणारे काळे धुराचे लोट अशी विमान कोसळल्यानंतरची काही दृश्य सोशल मीडियावर शेअर झाली आहेत. यातून दुर्घटनेची भीषणता कळू शकते.

पाकिस्तानचं प्रवासी विमान कराचीनजिक कोसळलं. लाहोरहून प्रवाशांना घेऊन निघालेलं पाकिस्तान एअरलाईन्सचं (PIA) विमान कराची विमानतळाच्या जवळच कोसळल्याचं वृत्त आहे. एअरबस 320 हे विमान कोसळलं आहे. यात सुमारे 100 प्रवासी असल्याचं समजलं. हे विमान निवासी भागात कोसळल्याची माहिती पुढे येत आहे.

मॉडेल कॉलनी विमानतळाजवळील वसाहतीवरच विमान कोसळल्याचं कळतं. तिथून धुराचे लोट येतानाचे VIDEO सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या पाकिस्तान एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्ता यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, PK8303 हे विमान कराचीकडे येत होतं. त्यामध्ये 99 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर होते.

हे विमान अपघातग्रस्त झालं असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. पण अधिक माहिती दिलेली नाही.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत गजबजलेल्या मॉडेल कॉलनी या भागात विमान कोसळलं आहे.

तिथे अँब्युलन्सची ये जा दिसते आहे. त्यामुळे या घटनेत मोठी हानी झाली असल्याची शक्यता आहे.

अद्याप पाकिस्तानकडून अधिकृतपणे अपघातात झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली गेलेली नाही.

First published: May 22, 2020, 5:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading