मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लैंगिक संबंधांदरम्यान संमतीशिवाय चुकूनही काढू नका कंडोम, दाखल होणार गुन्हा

लैंगिक संबंधांदरम्यान संमतीशिवाय चुकूनही काढू नका कंडोम, दाखल होणार गुन्हा

पत्नीशी बोलून तिच्या नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा.

पत्नीशी बोलून तिच्या नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा.

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणे आता बेकायदेशीर ठरवलं जाईल.

वॉशिंग्टन, 22 फेब्रुवारी : सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर ठरवलं जाईल, असा कायदा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया (California) राज्यात लवकरच केला जाणार आहे. या आठवड्यात या संबंधीचे विधेयक (Bill) कॅलिफोर्निया असेंब्लीत सदस्य क्रिस्टीना गार्सिया  (Cristina Garcia) यांनी सादर केले आहे. त्यानुसार सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढला तर पीडित व्यक्तीच्या दाव्यानुसार राज्य नागरी संहितेला अनुसरुन त्या व्यक्तीला नुकसानभरपाई दिली जाईल.

वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना गार्सिया म्हणाल्या, ‘ हे विधेयक मांडण्यामागे माझे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे पीडित व्यक्तीला न्याय मिळावा आणि दुसरा म्हणजे आपण पुस्तकांत जे वाचतो त्याबद्दल जाहीर चर्चा व्हावी, विशेष करून तरुणांनी याची चर्चा करावी. मग त्यांचे पालक, शिक्षक किंवा सार्वजनिक सुरक्षितता यंत्रणेतील व्यक्ती कुणीही तरुणांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांमध्ये या गोष्टींचा उल्लेख असला त्यासंबंधीचा कायदा असला, की आपल्याला काही वाईट गोष्टी टाळाव्यात याचं भान राहतं.’

हे ही वाचा-VIDEO: हॉटेलमध्ये रंगला Dance India Dance; वेटरचा डान्स पाहून लोक जेवायचं विसरले

संभोग करत असलेल्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय पुरुषाने त्याच्या लिंगावरील कंडोम काढून टाकला आणि संभोग केला तर तसं केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो. या कायद्याच्या माध्यमातून असं करणाऱ्या पुरुषावर कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार पीडित व्यक्तीला मिळणार आहे आणि जर कॅलिफोर्नियात हा कायदा झाला तर असा कायदा करणारं ते अमेरिकेतील पहिलं राज्य असेल. गार्सिया यांनी यापूर्वी दोनवेळा स्टिलथिंग (Stealthing) म्हणजेच पुरुषाने संभोगादरम्यान साथीदाराच्या परवानगीशिवाय कंडोम काढणे या संबंधित बिलं सादर केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे 2017 आणि 2018 मध्ये राज्य दंड संहितेत सुधारणा केली गेली, परंतु त्यानंतर बिलांवर सुनावणी झाली नाही. आता हे विधेयक अन्य राज्यांकरितादेखील मॉडेल ठरु शकेल अशी गार्सिया यांना आशा आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा स्वरुपाचा कायदा पास झाला तर राज्यातील हा पहिला कायदा असेल, की जो असंवेदनशीलपणे कंडोम हटवण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधेल.

सुमारे चार वर्षांपूर्वी येल विद्यापीठाच्या कायदा शाखेची विद्यार्थीनी अलेक्झांड्रा ब्रॉडस्कीने (Alexandra Broadsky) याबाबत कोलंबिया जर्नल ऑफ जेंडर अॅण्ड लॉमध्ये एक लेख प्रकाशित केला होता. त्यानंतर या प्रकाराबाबत  जागरुकता लक्षणीय प्रमाणात वाढली. त्यात तिनं असं म्हटलं होतं, की बऱ्याच जणांनी पीडित व्यक्तींच्या सन्मान आणि स्वायत्ततेचे गंभीर उल्लंघन केले आहे. तसेच तिने लैंगिक संबंधामुळे होणाऱ्या संसर्गाला आणि मनाविरुध्द गर्भधारणेला बळी पडलेल्या व्यक्तींच्या मानसिक धक्क्याविषयी लिखाण केलं होतं. सध्या नागरी हक्क वकील म्हणून कार्यरत असलेल्या ब्रॉडस्कीने द पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, की या विषयाबद्दल अजूनही गैरसमज आहेत. ही एक समस्या आहे, यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही.

या विषयाची व्याख्या स्पष्ट करताना ब्रॉडस्की म्हणतात, की जे लोक लैंगिक संबंधात आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारचं उल्लंघन होतं. पीडीत व्यक्तीनं लैंगिक संबंधांस मान्यता दिली असली, तरी या व्यक्तीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंधांदरम्यान कंडोम काढला जातो, तेव्हा असं उल्लंघन होतं. त्या म्हणाली की, कंडोम काढून टाकण्यासाठीची संमती, त्यामुळे होणारे आघात यांचे चित्रण करणारा `मी तुम्हाला नष्ट करु शकतो` हा शो मी एचबीओवर (HBO) सादर केला होता. त्यातून याबाबतचे विदारक चित्र मांडले होते. या शोचा आधार गार्सिया यांनी विधेयकासाठी घेतला आहे.

First published:

Tags: Sex, Sexual relationship