अर्जेंटीना, 26 नोव्हेंबर : ही घटना अर्जेंटीनामधील (Argentina News) सँटा या भागातील आहे. 'द मिरर' च्या एका ऑनलाइन रिपोर्टनुसार, येथील पराना नदीच्या (River) किनाऱ्यावर एक 13 वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबासह बसली होती. तिने नदीच्या थंडगार पाण्यात पाय टाकले होते आणि नदीचा-निसर्गाचा आनंद घेत शांत बसून होती. (Was enjoying nature by stepping into the river water The young woman trembled as she stepped out)
यानंतर काही वेळात तिच्यासोबत असं काही घडलं की, कोणी विचारही केली नसेल. रिपोर्टनुसार, मुलीने जेव्हा पाय बाहेर काढले तर तिचा अंगठा गायब झाला होता. एका अत्यंत धोकादायक माशाने मुलीचा अंगठा चावला होता. आणि अंगठा पायापासून वेगळा केला होता. पायाची अवस्था पाहून मुलीला आणि तिच्या आई-बाबांना धक्काच बसला. मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. नदीवर फिरण्यासाठी आलेल्या इतर स्थानिकांनी सांगितलं की, ते जेव्हा नदीकाठी फिरायला येतात त्यावेळी ते फार वेळ पाण्यात थांबत नाही. यामुळे जीवाला धोका असतो. फार वेळ पाण्यात थांबलं तर मासे हल्ला करण्याची शक्यता अधिक असते.
हे ही वाचा-या पठ्ठ्यानं टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा, बॉसही ठरला शेरास सव्वाशेर
आश्चर्यची बाब म्हणजे, या भागातील अनेक नागरिकांवर माशांनी हल्ला केला आहे. या नदीतील मासे नेहमी पर्यटकांवर हल्ला करतात. हे मासे जास्त तापमान आणि काठावर असलेल्या पाण्यात राहतात. स्थानिक नियमित नदीवर फिरायला येतात. पिराना नामक माशांची जात अत्यंत धोकादायक असते, तिचे दातही अत्यंत टोकदार असतात. त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish