वारेन बफेट,झुकरबर्ग यांचे एका दिवसात 570 अब्ज रुपये बुडाले

अमेरिकेच्या बाजारापेठेत सोमवारी आलेल्या जबरदस्त घसरणीचा वाॅरेन बफे यांना फटका बसलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2018 10:08 PM IST

वारेन बफेट,झुकरबर्ग यांचे एका दिवसात 570 अब्ज रुपये बुडाले

06 फेब्रुवारी : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार सुरू आहे. अमेरिकेच्या शेअर बाजाराचा फटका जागतिक बाजारपेठांनी बसतोय. त्यामुळे  भारतासह आशियातील बाजारपेठेत भूकंप आलाय. याचा फटका दिग्गज उद्योजकांना बसलाय.

वारेन बफेट

अमेरिकेच्या बाजारापेठेत सोमवारी आलेल्या जबरदस्त घसरणीचा वारेन बफेट यांना फटका बसलाय. त्यांचे शेअर एका दिवसात 6 टक्क्याने कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना तब्बल 5.3 अब्ज डाॅलर अर्थात 340 अब्ज रुपयांचं नुकसान झालंय. तरीही फोर्ब्सच्या श्रीमंत यादीत वारेन बफेट तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती सध्या 84.6 अब्ज डाॅलर इतकी आहे.

मार्क झकरबर्ग

फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गला 3.6 अब्ज डाॅलर अर्थात 230 अब्ज रूपयांचं नुकसानीचा फटका बसलाय. त्यांच्या गुंतवणुकीत 4.7 टक्क्यांनी कपात झालीये. फेसबुकचे शेअर 5 टक्क्याने गडगडले आहे. सोमवारी त्याची संपत्ती 73.1 अब्ज डाॅलर इतकी आहे.

Loading...

जेफ बेजॉस

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अॅमेझाॅनचे सीईओ जेफ बेजाॅस यांच्या संपत्तीत 3.2 अब्ज डाॅलरने कपात झालीये. अॅमेझाॅनने मागील आठवड्यात शानदार तिमाही निकाल जाहीर केला होता. बेजाॅस यांनी ही रक्कम एका दिवसात कमाई केली होती. आता बेजाॅस यांची संपत्ती 115.7 अब्ज डाॅलर इतकी आहे.

आॅटो लाईन इंडस्ट्रीज, फेडरल बँक आणि ओरियंट सिमेंटचे शेअर 24 टक्क्यांनी घसरले. झुनझुनवाला यांची 1 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी असलेल्या 30 शेअरमध्ये 20 टक्क्यांहुन जास्त शेअर 2018 मध्ये 32 टक्क्यांनी कमकूवत झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...