मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनमुळे जगासमोर आणखी एक धोका! अंतराळातून येणाऱ्या या संकटामुळे होणार वाताहत

चीनमुळे जगासमोर आणखी एक धोका! अंतराळातून येणाऱ्या या संकटामुळे होणार वाताहत

पुन्हा चीनमुळं जगावर संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 29 एप्रिलला चीननं 'लाँग मार्च 5 बी' (Long March 5B ) नावाचं रॉकेट (rocket) लाँच केलं होतं. तज्ज्ञांच्या मते हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलं असून ते फुटलंय.

बीजिंग, 04 मे: चीनमध्ये पाळमुळं असणाऱ्या कोरोनामुळे (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. अनेक देशांमध्ये मृतदेहांचा खच पडलाय. इतकं सगळं होऊनही आपणचं हा विषाणू (COVID-19 China) पसरवण्यास जबाबदार असल्याचं चीननं मान्य केलेलं नाही. त्यातच आता पुन्हा चीनमुळं जगावर संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 29 एप्रिलला चीननं 'लाँग मार्च 5 बी' (Long March 5B ) नावाचं रॉकेट (rocket) लाँच केलं होतं. तज्ज्ञांच्या मते हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलं असून ते फुटलंय. येत्या काही दिवसांत या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर विविध ठिकाणी पडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ ठेवत आहेत लक्ष

अंतराळातील घडामोडींचं निरीक्षण करणाऱ्या जोनाथन मॅक्डोवेल (Jonathan McDowell) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचं रॉकेट अंतराळात (space) फुटलं आहे. त्यांचे अवशेष अंतराळात पसरले असून ते वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत. या अवशेषांची स्थिती पाहता त्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. न्यूयॉर्क (New York), माद्रिद (Madrid), बीजिंग (Beijing), चिली (Chile) आणि न्युझीलंडच्या (New Zealand) काही भागांत हे अवशेष पडू शकतात.

(हे वाचा-27 वर्षाच्या नात्यानंतर विभक्त झाले बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा, सांगितलं कारण)

कुठेही होऊ शकतो स्फोट

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनचं 100 फुट लांबीचं हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद इतक्या वेगानं खाली येतंय. याचे तुकडे कुठेही पडून स्फोट (Blast) होऊ शकतो. 29 एप्रिलला चीननं Long March 5B लाँच केलं होतं. याच्या मदतीनं चीनअंतराळात नवीन स्पेस स्टेशन (New space station) तयार करणार होतं.

(हे वाचा-बापरे! किचनचा तुटलेला पाइप दुरुस्त करण्यासाठी प्लंबरने मागितले तब्बल 4 लाख)

काय होता चीनचा प्लॅन?

या रॉकेटच्या मदतीनं चीन अंतराळात Tiangong (टियानगाँग) नावाचं स्पेस स्टेशन तयार करणार होता. 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. हे स्टेशन पृथ्वीभोवती फेऱ्या मारून अंतराळातील माहिती चीनला पाठवणार होतं. मात्र, आता रॉकेटचं फुटल्यानं चीनचा प्लॅन फसला आहे. फुटलेलं रॉकेट पृथ्वीवर पडून नुकसान होण्याच्या शक्यते बाबत चीनलाही कल्पना आहे. मात्र, अद्याप त्यांनी याची माहिती जाहीर केलेली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: China, Coronavirus, Space, Space Centre