Home /News /videsh /

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून अमेरिकेसमोर 9/11 चा उल्लेख! म्हणाले, आता तरी...

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून अमेरिकेसमोर 9/11 चा उल्लेख! म्हणाले, आता तरी...

युक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करण्याच्या मागणीवर जोर दिला आहे. आपल्या संबोधनात, त्यांनी अल कायदाचा 11 सप्टेंबर 2001 रोजी (9/11 Attack) झालेल्या हल्ल्यांसह दुसऱ्या महायुद्धादरम्यान पर्ल हार्बरवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की युक्रेनला मजबूत संरक्षण प्रणालीची गरज आहे. कारण रशियाने आकाशाला मृत्यूचे साधन बनवले आहे.

पुढे वाचा ...
    कीव, 17 मार्च : रशिया-युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) युक्रेनला पाश्चात्य मदतीची स्थिती अजूनही अनेक बाबतीत अस्पष्ट आहे. 21 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धाचा आधार नाटोच्या (NATO) माध्यमातून रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी, युक्रेनने नाटोचे सदस्यत्व मिळवणे ही सुरक्षेच्या अधिकाराची बाब असल्याचे म्हटले. युद्ध सुरू राहिल्यानंतरही रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. युक्रेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य देशही आपापल्या परीने मदत करत आहेत. अलीकडेच, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना 9/11 हल्ल्याचा उल्लेख केला. हल्ल्याचे कारण काय आहे? यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात झेलेन्स्की यांचा मुख्य भर युक्रेनवर नो-फ्लाय झोन घोषित करण्यावर होता. अमेरिका सुरुवातीपासूनच हे टाळत आली आहे. जर असे केले गेले तर तो रशियावरचा हल्ला मानला जाईल आणि त्यामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता खूप जास्त आहे असे त्यांचे आणि नाटोचे मत आहे. दोन विशेष घटनांचा उल्लेख झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा नो फ्लाय झोनची मागणी केली असून त्यासाठी त्यांनी आपली बाजू भक्कम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला आहे. त्यांनी अमेरिकेला त्या परिस्थितीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे, जेव्हा नो-फ्लाय झोन जाहीर करावा लागतो. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील दोन खास घटना निवडल्या. Russia Ukraine War:एकीकडे युद्धाच्या झळा तर दुसरीकडे चिनी तरुणांना भलतीच लगीनघाई 9/11 आणि पर्ल हार्बर झेलेन्स्की यांनी काँग्रेसमध्ये अमेरिकेला 11 सप्टेंबर 2001 मधील अल कायदाचा हल्ला तसेच दुसऱ्या महायुद्धातील पर्ल हार्बरवरील हल्ल्याची आठवण करून देत युक्रेन यावेळी अशाच प्रसंगातून जात असल्याचे सांगितले. अशा स्थितीत रशियाच्या हल्ल्यांमुळे नो फ्लाय झोनची घोषणा अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते म्हटले. पर्ल हार्बर घटना दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने 1941 मध्ये अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला केला होता, त्यानंतर अमेरिकेने जपानवर आण्विक हल्ला करण्याचा निर्णय घेतला. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. या हल्ल्यानंतरच दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला होती. त्यांनी बिनशर्त शरणागती पत्करली. 11 सप्टेंबर 2001 रोजी काय घडलं? 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत चार विमानांचे अपहरण करण्यात आले. त्याद्वारे एक सुनियोजित आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये न्यूयॉर्क आणि पेंटागॉन इमारती नष्ट झाल्या. अमेरिकेने या घटनेला स्वतःवरचा हल्ला मानून जगभर दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले होते. तेच महत्व अमेरिकेने युक्रेनला द्यावं : झेलेन्स्की आपल्या भाषणात झेलेन्स्की म्हणाले की युक्रेनची स्थिती आता तशीच आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने तशीच प्रतिक्रिया दिली पाहिजे. अमेरिकेने युक्रेनवरील हल्ल्यालाही तेवढेच महत्त्व द्यावे, अशी झेलेन्स्कीची इच्छा होती. ते म्हणाले की, युक्रेनला नो-फ्लाय झोनची गरज आहे, पण जर ते जास्त असेल तर त्यांना लढाऊ विमाने पुरवली पाहिजेत. आपल्या भाषणात झेलेन्स्की म्हणाले, “आम्हाला माहित आहे की आम्हाला कोणत्या प्रकारच्या संरक्षण प्रणालीची आवश्यकता आहे. आम्हाला S300 किंवा तत्सम संरक्षण प्रणाली लागेल. आपला देश सध्या एका वाईट टप्प्यातून जात आहे आणि तो केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण युरोपसाठी आहे. म्हणूनच मी तुम्हाला आणखी काही करायला सांगतोय. रशियाने आकाशाला मृत्यूचे स्रोत बनवले असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या