Home /News /videsh /

युद्ध समाप्तीसाठी रशियाचं सकारात्मक पाऊल? झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला 'तो' प्रस्ताव

युद्ध समाप्तीसाठी रशियाचं सकारात्मक पाऊल? झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला 'तो' प्रस्ताव

putin and zelensky

putin and zelensky

युक्रेनचे (Ukraine Crisis) अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांना चर्चेसाठी प्रस्ताव पाठवला आहे.

    नवी दिल्ली, 13 मार्च: युक्रेनचे (Ukraine Crisis) अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांना चर्चेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. दोन्ही देशांमधील शांतता चर्चेत मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी संपर्क साधला आहे. झेलेन्स्की यांनी ट्विट करत शांततेच्या प्रस्तावाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी त्यामध्ये रशियासोबच चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. इस्रायली पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीवर चर्चा केली. आम्ही रशियन आक्रमण आणि शांतता चर्चेच्या संभाव्यतेबद्दल बोललो. आपण नागरिकांवरील दडपशाही थांबवली पाहिजे. मेलिटोपोलचे महापौर आणि स्थानिक सार्वजनिक व्यक्तींच्या सुटकेसाठी मी इस्रायली पंतप्रधानांची मदत घेतली असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तसेच, रशियाकडूनन असेही संकेत मिळत आहेत की व्लादिमीर पुतिन युक्रेनचे त्यांचे समकक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी युद्ध संपवण्यासाठी बैठकीसाठी तयार होऊ शकतात. व्लादिमीर पुतिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेमलिन प्रेस पूलने शुक्रवारी सोशल मीडियावर नोंदवले, "पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठकीची शक्यता कोणीही नाकारत नाही." क्रेमलिनने जाहीर केल्याप्रमाणे, हे शक्य आहे." चर्चेच्या तीन फेऱ्या आधीच झाल्या आहेत. अशा स्थितीत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रस्तावावर रशियाच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहिले जात आहे. रशिया युक्रेन युद्धाला आजा 17 वा दिवस आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने पुन्हा एकदा सांगितले की मॉस्कोचे विशेष लष्करी ऑपरेशन केवळ युक्रेनियन लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे आणि तेथील नागरी लोकसंख्येला धोका नाही. तथापि, पाश्चात्य देशांनी रशियाचे दावे फेटाळले आहेत आणि युक्रेनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून मॉस्कोवर व्यापक निर्बंध लादले आहेत. रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला याशिवाय, युक्रेनमधील रशियाच्या कारवायांचे समर्थन करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी त्याचा शेजारी देश बेलारूसवरही निर्बंध लादले आहेत. 22 फेब्रुवारी रोजी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डोनेस्तक आणि लुहान्स्कला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी त्यांच्या सैन्याला युक्रेनमध्ये विशेष लष्करी ऑपरेशन सुरू करण्याची परवानगी दिली होती.
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या