रेक्यावीक, 06 एप्रिल: दोन आठवड्यापूर्वी आइसलँडमध्ये ज्वालामुखी फुटला होती. यावेळी मोठ्या प्रमाणात लाव्हारस बाहेर पडत होता. यानंतर आता पुन्हा एकदा याठिकाणाहून धक्कादायक फोटो आणि व्हिडीओज समोर येत आहेत. यापूर्वी ज्याठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्याठिकाणाहून साधारणतः एक किमी अंतरावर दुसऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक (Volcano erupts in Iceland) झाला आहे. या ठिकाणचे भीतीदायक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Volcano video) मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
हा ज्वालामुखी इतका भयानक आहे की, त्यामुळे तब्बल 200 मीटर रुंदीची आगीची नदी वाहत असल्याचं (200 meter wide river flow with lava) चित्र पाहायला मिळत आहे. आइसलँड हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, या ज्वालामुखीचा उद्रेक स्थानिक वेळेनुसार दुपारी बारा वाजता झाला आहे. आयसलँडमध्ये या ज्वालामुखीचं लाइव्ह प्रसारण करण्यात येत आहेत. याठिकाणी चहूबाजूला धुराचे लोट पसरले आहेत. तर परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या ज्वालामुखीतून फुटलेला लाव्हारस मेरारडालीर नावाच्या खोऱ्यात पसरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला हा लाव्हारस पसरण्याचा वेग 10 मीटर प्रतिसेंकद इतका वेगवान होता. पण आता याचा वेग थोडा कमी झाला आहे. आइसलँड हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्वालामुखी उफळणाऱ्या परिसराच्या आसपास राहणाऱ्या लोकांचं स्थलांतर केलं जात आहे. तर 19 मार्चपासून याठिकाणी अनेक पर्यटक ज्वालामुखीचं उग्र रुप पाहण्यासाठी येत आहेत. तज्ज्ञांच्या मते हा ज्वालामुखी आणखी काही आठवडे असाच राहू शकतो. हे ठिकाण आइसलँड्सची राजधानी रेक्यावीकपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.
🌋 This volcano in Iceland has erupted for the first time in 6,000 years. It's been spewing lava since March 19.
We gathered footage from different angles to walk you through the eruption. 👇 pic.twitter.com/uxBjKuDMtW — Science Insider (@SciInsider) April 4, 2021
हे ही वाचा - आपोआप गरम होतं या हजारो वर्ष जुन्या झऱ्यांचं पाणी, आजवर उलगडलेलं नाही कोडं
800 वर्षांनंतर झाला विस्फोट
फगराडल्स डोंगरावर फुटलेला हा ज्वालामुखी गेल्या 800 वर्षांपासून फुटला नव्हता. पण अलीकडेच याठिकाणी भूकंप झाला होता, त्यामुळे या ज्वालामुखीचा स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीच्या फुटेजमध्ये हा स्फोट साधारण वाटत होता. पण या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हारस पाहता त्याच्या उग्र रुपाची कल्पना आली आहे. तब्बल 32 किलोमीटर अंतरावरून हा लाव्हारस स्पष्टपणे दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.