निर्मळ प्रेम! दोन मित्र असे कडकडून भेटतात तेव्हा... VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

निर्मळ प्रेम! दोन मित्र असे कडकडून भेटतात तेव्हा... VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

न्यूयॉर्कमधल्या रस्त्यावर हे दोन छोटे मित्र किती आनंदाने भेटतात याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा VIDEO एकदा बघाच. निर्मळ प्रेम आणि निर्भेळ आनंद पाहून तुम्हीही नक्की कराल शेअर

  • Share this:

न्यूयॉर्क, 11 सप्टेंबर : न्यूयॉर्कमधल्या रस्त्यावर दोन छोटे मित्र किती आनंदाने भेटतात याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Facebook वर यांच्यापैकी एकाच्या बाबाने हा VIDEO शेअर केला आणि या छोट्या दोस्तांचे चाहते वाढायला लागले.

मॅक्सवेल आणि फिनिगन अशी या दोन छोट्या आणि निरागस दोस्तांची नावं. त्यापैकी मॅक्सवेलच्या वडिलांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मॅक्सवेल आणि फिनिगन दोन वर्षांचे आहेत. गेलं वर्षभर ते एकमेकांना ओळखतात आणि त्यांच्यात इतकी घट्ट मैत्री आहे की, एकमेकांबरोबर नसतील तेव्हाही ते सतत दुसऱ्याबद्दल बोलत असतात, असं त्यांचे वडील मायकेल सिसनेरॉस यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं. त्यांनीच या दोघांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. फेसबुक आणि ट्विटरवरून लोक तो शेअर करत आहेत.

वंशवाद, हेवेदावे, मत्सर या कशाची पुसटशीही ओळख नसलेले हे सच्चे मित्र निरागसपणाची ओळख होतात आणि असं निर्मळ प्रेम आणि निर्भेळ आनंद याची साक्ष देतात.

अमेरिका आणि युरोपातल्या बहुतेक सगळ्या वृत्तसंस्थांनी या गोड व्हिडिओची दखल घेतली आहे. लहान मूल वंशवाद घेऊन जन्माला येत नाही, तो नंतर पेरला जातो, या अर्थाच्या कमेंट्स या व्हिडिओवर आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 04:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading