इस्लामाबाद, 20 फेब्रुवारी: जागतिक राजकारणात हसं करुन घेणाऱ्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी सौदीचे युवराज महंमद बिन सलमान पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. अन्य देशांप्रमाणेच पाकने देखील त्यांचे शाही स्वागत केले. सौदीच्या युवराजासाठी भोजणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अलवी, पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते.
नियोजनाप्रमाणे भोजनाचा कार्यक्रम सुरु झाला. पंतप्रधान इम्रान खान यांनी भोजन सुरु करण्यास सुरुवात केली आणि दुसरीकडे राष्ट्रपती अलवी यांनी भाषणास सुरुवात केली. आता सौदीचा युवराजासारखी मोठी व्यक्ती आली काही प्रोटोकॉल पाळणे अपेक्षित असते. युवराजांसमोर भाषण करताना पाकच्या राष्ट्रपतींनी उभे राहून भाषण करणे अपेक्षित होते. पण अलवी यांनी बसूनच भाषण वाचण्यास सुरुवात केली. त्यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी हस्तक्षेप करत थेट राष्ट्रपतींनी उभे राहून भाषण करण्यास सांगितले. आता सर्वांसमोर असा सल्ला मिळाल्यानंतर राष्ट्रपतींनी उभे राहून भाषण केले.
एखाद्या देशाचा विचार करता राष्ट्रपती हे पद पंतप्रधानापेक्षा घटनात्मकदृष्ट्या मोठे असते. राष्ट्रपतींच्या एखाद्या निर्णयात थेट हस्तक्षेप करत नाहीत. पण सौदींच्या युवराजांसमोर राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल तोडल्याने इम्रान खान यांनी 'खड़े हो जाएं' (उभे रहा) असा सल्ला दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
PM is busy eating, President begins address sitting down, then is told: "kharay hu jaey". They have to be micro managed all the time. pic.twitter.com/59w6Dbf60p
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) February 18, 2019
एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा