Home /News /videsh /

ब्लास्टमध्ये दोन्ही पाय गमावलेल्या नर्सने हॉस्पिटलमध्येच प्रियकरासोबत केलं लग्न; युद्धग्रस्त युक्रेनमधीन हृदयस्पर्शी VIDEO

ब्लास्टमध्ये दोन्ही पाय गमावलेल्या नर्सने हॉस्पिटलमध्येच प्रियकरासोबत केलं लग्न; युद्धग्रस्त युक्रेनमधीन हृदयस्पर्शी VIDEO

27 मार्चला ओक्साना आपला होणारा पती व्हिक्टर याच्यासोबत जात होती. त्यावेळी खाणीमध्ये झालेल्या एका ब्लास्टमुळे ती भयंकर जखमी (Ukraine nurse lost legs in blast) झाली

नवी दिल्ली 03 मे : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धादरम्यान, हिंसाचार आणि अत्याचाराचे अनेक व्हिडिओ (Ukraine war videos) समोर आले आहेत; मात्र माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय देणाऱ्याही कित्येक घटना युक्रेनमध्ये घडल्याचं दिसून आलं आहे. असाच एक व्हिडिओ (Ukraine nurse viral video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक नर्स आणि तिच्या पतीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपले अश्रू रोखणं कठीण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ युक्रेनच्या लवीव शहरातला आहे. यामध्ये एक जोडपं आपल्या लग्नाचा आनंद साजरा (Ukraine nurse wedding) करत आहे. विशेष म्हणजे, यातल्या वधूने एका ब्लास्टमध्ये आपले दोन्ही पाय गमावले होते; मात्र त्यानंतरही आपल्या लग्नामध्ये पतीसोबत ती सुंदर असा डान्स करत आहे. युद्धामध्ये बेचिराख झालेल्या युक्रेनमधल्या या व्हिडिओतून, प्रेमाची ताकद काय असते हेच दिसून येत आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले होते रशियन फौजेच्या तावडीतून, अंगावर शहारे आणणारा प्रसंग लवीव मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ओक्साना नावाच्या एका नर्सचा आहे. 27 मार्चला ओक्साना आपला होणारा पती व्हिक्टर याच्यासोबत जात होती. त्यावेळी खाणीमध्ये झालेल्या एका ब्लास्टमुळे ती भयंकर जखमी (Ukraine nurse lost legs in blast) झाली. या ब्लास्टमध्ये व्हिक्टरला जास्त जखमा झाल्या नाहीत; मात्र ओक्सानाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. व्हिक्टर आणि ओक्साना गेल्या सहा वर्षांपासून सोबत आहेत. या दोघांना मुलंदेखील आहेत. लग्नाला काही दिवस शिल्लक असतानाच हा मोठा अपघात झाला; मात्र त्यानंतरही व्हिक्टरने तिची साथ सोडली नाही. विशेष म्हणजे, एक आठवड्यापूर्वीच ओक्सानाला लवीवमधल्या रुग्णालयात आणलं होतं. या दोघांनीही या हॉस्पिटलमध्येच लग्न (Ukraine nurse wedding in hospital) केलं. वॉर्डमध्ये लग्न केल्यानंतर व्हिक्टरने ओक्सानाला उचलून घेऊन डान्स (Ukraine nurse wedding dance) केला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि इतर रुग्णांनीही टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळलं, मागील 24 तासांत 200 युक्रेनियन सैनिकांचा मृत्यू व्हिक्टर आणि ओक्सानाच्या लग्नाची बातमी युक्रेनच्या एका खासदारानेही शेअर केली. “आपले दोन्ही पाय गमावलेल्या लिसीचांस्कच्या एका नर्सने लवीवमध्ये लग्न केलं.” अशा कॅप्शनसह त्यांनी ही बातमी शेअर केली आहे. हा व्हिडिओ (Ukraine nurse wedding video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युद्धामध्येही आनंदाचे असे छोटे छोटे क्षण बरंच सुखावतात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. दरम्यान, ओक्साना आता कृत्रिम पाय बसवण्याच्या तयारीत आहे. या सर्जरीसाठीच ओक्सानाला लवीवच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. काही दिवसांमध्ये तिची प्रोस्थेटिक सर्जरी पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
First published:

Tags: Marriage, Russia Ukraine

पुढील बातम्या