झिएंगसु 21 नोव्हेंबर : धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे ही चेतावणी प्रत्येक सिगारेट पॅकेटवर लिहिलेली आहे. परंतु असे असूनही बरेच लोक सिगरेट पिताना दिसतात. सिगरेटच्या धुरामुळे फुफ्फुसात टार जमा होतं. एका 52 वर्षीय व्यक्तीचा धुराच्या व्यसनाने खराब झालेल्या फुफ्फुसांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून सतत धूम्रपान करते.
या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बर्याच काळापासून धूम्रपान केल्यामुळे या व्यक्तीच्या फुफ्फुसात इतका टार जमा झाला आहे की फुफ्फुसे संपूर्ण काळी झाली आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 25 दशलक्ष लोकांनी पाहिलेला आहे. मिरर यूके डॉट कॉमने याबद्दल माहिती दिली आहे.
This is what lungs of a chain smoker look like...😱😮 pic.twitter.com/DJLi5CYUce
— Sci-TechUniverse.com (@scitechuniverse) November 18, 2019
हा व्हिडिओ चीनच्या झिएंगसु प्रांतातील युक्सी पीपुल्स हॉस्पिटलचा आहे. डॉक्टर चेन झिएंगु आणि त्यांची प्रत्यारोपण टीमने या फुफ्फुसांचा तपास करीत आहेत. खरंतर, या फुफ्फुसांना प्रत्यारोपणासाठी दान करण्यात आलं आहे. परंतु बर्याच काळापासून सिगारेटमध्ये तंबाखूमुळे फुफ्फुसांचा रंग गुलाबीऐवजी काळा झाला आहे.
सोशल मीडिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओला 'best anti-smoking ad ever' असे नाव दिले आहे. डॉक्टर चेन झिएंगु यांनी डेली मिररला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यारोपणासाठी ज्याने आपल्या फुफ्फुसांचे दान केले त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे फुफ्फुस दान करण्यात आले. पण फुफ्फुस इतके वाईट झाले आहे की त्याला यापुढे कोणासाठीही वापरता शकत नाही. असे केल्याने संबंधित व्यक्तीस फुफ्फुसाचा कॅल्सीफिकेशन (Lung Calcification), बुल्सस फुफ्फुसांचा आजार (Bullous Lung Disease)आणि पुलमॉनरी एम्फीसेमासारखे (Pulmonary Emphysema)गंभीर आजार होऊ शकतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा