VIDEO : अजब आंदोलन! पंतप्रधान येताच डॉक्टरांनी असं काही केलं की पाहून विश्वास बसणार नाही

VIDEO : अजब आंदोलन! पंतप्रधान येताच डॉक्टरांनी असं काही केलं की पाहून विश्वास बसणार नाही

रुग्णालयाचा दौरा करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांचा कोरोना वॉरियर्सनी असा केला निषेध.

  • Share this:

ब्रसेल्स, 19 मे : संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरसच्या जैविक युद्धात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर कोरोना वॉरियर्स बनून लोकांची सेवा करत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी असणारे PPE कीट मिळत नाही. त्यामुळं जगभरातील विविध देशांमध्ये सध्या डॉक्टरांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका बेल्जियमच्या पंतप्रधान सोफी विल्म्स (Belgium Prime Minister Sophie Wilmès) यांनाही बसला.

सोफी विल्म्स डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी रुग्णालयात पोहचल्या. मात्र त्यांना पाहताच उपस्थित सर्व डॉक्टरांनी तोंड फिरवले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर-परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शांततेत पंतप्रधानांचा निषेध केला. बेल्जियममध्ये, वैद्यकीय कर्मचार्‍यांना PPE कीट आणि इतर सुरक्षा उपकरणे मिळत नाही आहेत.

वाचा-या छत्रीत दडलंय काय? ऊन-पावसासोबत आता पोलिसांचा मोबाईलही चार्ज होणार

बेल्जियममधील सेंट पीटर हॉस्पिटलला भेट देणाऱ्या पंतप्रधान सोफी यांच्याविरोधात शांततेत निदर्शने करण्यासाठी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी पूर्ण तयारी केली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून आले आहे की पंतप्रधानांचा ताफा रूग्णालयाला भेट देण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात दाखल होताच वैद्यकीय कर्मचारी पाठ वळवून उभे राहिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बेल्जियमच्या अनेक प्रसिद्ध पत्रकारांनी शेअर केला आहे.

वाचा-बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO

सरकारी धोरणांचा असा काढला राग

बेल्जियम रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कमी पगार, कमी आरोग्याचा अर्थसंकल्प, सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि ट्रेंड नर्सच्या जागी लोकांना कामावर घेण्यासारख्या सरकारच्या या धोरणांचा निषेध केला. या भरती थांबवल्या पाहिजेत आणि सुरक्षा उपकरणे लवकरात लवकर द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे. बेल्जियममध्ये कोरोना संसर्गाची 55 हजार 200 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर सुमारे 10 हजार 000 लोकांना संक्रमणामुळे बळी गेले आहेत.

वाचा-दफनभूमीत मृतानं केलं बाय बाय; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

First published: May 18, 2020, 10:14 PM IST

ताज्या बातम्या