अबब! जमीन हादरली आणि रूफटॉप स्वीमिंग पूलची झाली ही अवस्था; भूकंपाचा LIVE VIDEO व्हायरल

भूकंपाच्या वेळी 48व्या मजल्यावरच्या स्वीमिंग पूलची काय अवस्था झाली, हे दाखवणारा व्हिडिओ मंगळवारपासून जगभर व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 08:26 PM IST

अबब! जमीन हादरली आणि रूफटॉप स्वीमिंग पूलची झाली ही अवस्था; भूकंपाचा LIVE VIDEO व्हायरल

मनिला (फिलिपाईन्स), 24 एप्रिल : फिलीपाईन्स या देशातलं महत्त्वाचं बेट लूझन सोमवारी (22 एप्रिल)भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. रिश्टर स्केलवर 6.3 एवढा मोठा भूकंपाचा धक्का बसला. एकाएकी उंच इमारतींची तावदानं, खिडक्या हलायला लागल्या, काही ठिकाणी बांधकाम पडलं, झाडं पडली. यात भूकंपात 11 जणांचा जीव गेला तर 20 जण गंभीर जखमी झाले. भूकंपाच्या वेळी एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या स्वीमिंग पूलची काय अवस्था झाली, हे दाखवणारा व्हिडिओ मंगळवारपासून जगभर व्हायरल झाला आहे.

मनिला शहरातली अँकर स्कायसूट ही प्रसिद्ध इमारत. या इमारतीच्या 48व्या मजल्यावर आलिशान स्वीमिंग पूल आहे. भूकंपाच्या हादऱ्यांनी स्वीमिंग पूलच्या भिंतींना धक्का बसला. त्यानंतरही भूकंपाचे सौम्य धक्के बसत होतो. यात स्वीमिंग पूलला तडा गेला आणि 48 व्या मजल्यावरून असं पाणी उसळलं.


Loading...रूफटॉप स्वीमिंग पुलावरून एखाद्या अजस्र धबधब्याप्रमाणे पाणी कोसळायला लागलं. "व्यवस्थापनानं पूल फुटल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात वाहणाऱ्या पाण्यावर नियंत्रण मिळवलं", असं या इमारतीच्या मालक कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...