Coronavirus : लोकं ऐकेना, व्लादिमीर पुतिन यांनी रस्त्यावर सोडले 800 सिंह आणि वाघ?

Coronavirus : लोकं ऐकेना, व्लादिमीर पुतिन यांनी रस्त्यावर सोडले 800 सिंह आणि वाघ?

रशियामध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. 300 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहे.

  • Share this:

 

नवी दिल्ली, 23 मार्च :  कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. अनेक देशांनी शहरं आणि राज्यात लॉकडाउन घोषित केला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर रशिया (Russia) मध्ये सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. यामध्ये

राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन ( President Vladimir Putin) यांनी लोकांनी घरात राहावं यासाठी आवाहन केलं. पण, लोकं काही ऐकायचं नाव घेत नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर 800 सिंह आणि वाघ सोडले आहे.

पुतिन यांचा हा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. लोकं वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. एका व्यक्तीने हा मॅसेज शेअर करत म्हटलं की, 'पुतिन यांनी रशियन लोकांना दोन पर्याय दिले आहे एक तर दोन आठवडे घरात राहा किंवा 5 वर्ष जेलमध्ये राहावं. मध्ये कोणताच रस्ता नाही. लोकांनी घरातून निघू नये म्हणून रस्त्यावर 800 सिंह आणि वाघ सोडले आहे.

रशियात कोरोनाचं थैमान

रशियामध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. 300 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णं आढळले आहे. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

फॅक्ट चेकमध्ये निघालं खोटं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मॅसेज तपासून पाहिला असता हे खोटं असल्याचं समोर आलं आहे. खरंतर हा व्हायरल झालेला फोटो 4 वर्षांपूर्वीचा आहे.

हा फोटो 2016 मधील डेली मेलमध्ये प्रसिद्ध झाला होता. हा फोटो आफ्रिकेतला आहे.  परंतु, फेक न्यूज या फेक असतात त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

First published: March 23, 2020, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या