... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

काश्मीर संदर्भातीत एका वृत्तवाहिनीवरील चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 09:00 AM IST

... आणि यांना काश्मीर पाहिजे; पाकमधील व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

इस्लामाबाद, 20 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान(Pakistan)मध्ये केवळ एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे काश्मीर, काश्मीर आणि काश्मीर होय. काश्मीर(Kashmir) आणि भारतासंदर्भात खोटा प्रचार करून देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोणीही साथ देत नाही. भारताविरुद्ध प्रचार करण्यात जसे पाकिस्तानी राजकीय नेते मागे नाहीत तसेच येथील मीडिया देखील मागे नसतो. काश्मीर संदर्भातीत एका वृत्तवाहिनीवरील चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनी(Pakistan News channel)वर काश्मीर मुद्द्यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा लाईव्ह सुरु होती आणि त्यासाठी दोन वक्ते होते. चर्चा सुरु असताना एका वक्त्याची खुर्ची तुटली आणि तो चक्क खाली पडला. आता अचानक झालेल्या या प्रकारामुळे वृत्तवाहिनीच्या निवेदकाला देखील धक्का बसला. या घटनेची प्रतिक्रिया त्याच्या चेहऱ्यावर आली देखील. पाकिस्तानमधील GTV वृत्तवाहिनीवर 16 सप्टेंबर रोजी काश्मीर मुद्द्यावर लाईव्ह चर्चा सुरु होती तेव्हा हा प्रकार घडला. खुर्ची तुटल्याने मजहर बरलास हे वक्ते खाली पडले. या प्रकारानंतर निवेदकाने जीभ बाहेर काढत प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.

अर्थात पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील लाईव्ह चर्चे दरम्यान मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. अगदी संयुक्त राष्ट्र संघात देखील काश्मीर विषय नेला पण पाकिस्तानला कोणीच उभे करून घेतले नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. हे सर्व करून झाल्यानंतर खान यांनी काश्मीर विषयावर जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या मुस्लिम देशांच्या दारात इम्रान खान गेले. पण मुस्लिम देशांनी देखील त्यांना उभे करुन घेतले नाही. काश्मीर मुद्द्यावरुन सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध सभ्य भाषेत बोलण्याचा सल्ला मुस्लिम देशांनी इम्रान खान यांना दिला होता. काश्मीर संदर्भात भारताने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. प्रथम भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परदेशी दौऱ्यासाठी त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यासाठी हवाई क्षेत्राचा वापर करण्यास पाकिस्तानने परवानगी नाकारली.

Loading...

SPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना! भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...