Home /News /videsh /

वडिलांनी गिफ्ट दिलेल्या Whiskey च्या बाटल्या विकून तरुणाने घेतलं घर; 28 वर्षं वडील देत होते बर्थ डे गिफ्ट

वडिलांनी गिफ्ट दिलेल्या Whiskey च्या बाटल्या विकून तरुणाने घेतलं घर; 28 वर्षं वडील देत होते बर्थ डे गिफ्ट

मुलगा जन्माला आल्यापासून प्रत्येक वाढदिवसाला हे वडील 18 वर्षं जुनी whiskey (18 year old scotch) भेट द्यायचे. आता मुलगा 28 वर्षांचा झाला आहे. या गिफ्टची एकत्रित किंमत किती असेल?

    लंडन, 9 सप्टेंबर : अनेकदा आपल्याला आपल्या वाढदिवशी किंवा आयुष्यातील एखाद्या खास दिवशी मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून गिफ्ट मिळत असतं. त्याचबरोबर कुटुंबातल्या व्यक्तींकडून देखील काही खास भेटवस्तू मिळत असतात. या आपल्या स्थानिक परंपरा असतात किंवा दुसऱ्यांप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्याच्या या पद्धती आहेत. मात्र आपल्या वडिलांकडून कधीही व्हिस्कीची बाटली गिफ्ट म्हणून मिळत नाही, आपल्या देशात तशी पद्धत नाही. नवजात बालकाला कुणी व्हिस्की गिफ्ट दिल्याचंही ऐकिवात नाही. मात्र स्कॉटलंडमध्ये असे वडील आहेत, ज्यांनी आपल्या मुलाला जन्माला आल्यापासून प्रत्येक वर्षी एक व्हिस्कीची बाटली गिफ्ट दिली आहे. स्कॉटलँडमधील ही व्यक्ती मागील 28 वर्षांपासून आपल्या मुलाला व्हिस्की गिफ्ट करत आहे. आता 28 वर्षांचा झालेल्या या मुलाने या व्हिस्कीच्या बाटल्यांचा योग्य उपयोग करायचे ठरवलं असून या बाटल्या विकून तो स्वतःसाठी घर विकत घेणार आहे. मॅथ्यू नावाच्या या मुलाला 18 वर्षं जुनी व्हिस्की त्याचे वडील दरवर्षी गिफ्ट देत आहेत. त्याच्या वाढदिवशी त्याला हे गिफ्ट म्हणून द्यायची ही त्यांची 'परंपरा' 18 वर्षं सुरू ठेवण्याचा विचार होता. पण नंतरही वडील वाढदिवसाची ही स्पेशल गिफ्ट देत राहिले. स्कॉटलंडची व्हिस्की अर्थात स्कॉच जितकी जुनी तितकी चांगली मानली जाते. जुन्या स्कॉचची किंमत तर खूपच असते.  मॅकॅलन सिंगल माल्ट व्हिस्कीच्या या बाटल्या खरेदी करण्यासाठी वडिलांनी आतापर्यंत 5 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षांनंतर आता या व्हिस्कीची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली असून जवळपास 40 लाख रुपये इतकी किंमत या सर्व बाटल्या विकल्यानंतर मिळू शकते. त्यामुळे आता मॅथ्यूने आपल्या वडिलांनी दिलेल्या या बाटल्या विकून आपल्या घरासाठी रक्कम उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि मध्य आशियातील काही जणांनी त्याच्या या बाटल्या खरेदी केल्या आहेत.  याविषयी माहिती बीबीसीला देताना वडील पीट यांनी सांगितलं की, 'मॅथ्यूच्या जन्मावेळी त्याला एक बाटली गिफ्ट केली होती. त्यामुळे ठरवलं की, तो 18 वर्षांचा होईपर्यंत दरवर्षी त्याला एकेक बाटली आपण गिफ्ट म्हणून द्यायची.' याच्याविषयी अधिक बोलताना ते सांगतात, 'बाळाला व्हिस्कीची बॉटल गिफ्ट करणे खरं तर  प्रचलित नाही. पण ही विलक्षण गिफ्ट मी मुद्दामच द्यायचं ठरवलं. मॅथ्यूसाठी आम्ही कडक नियम घातले होते. गिफ्ट दिल्यानंतर ते उघडायचे नाही. 18 वर्षांचा झाल्यानंतर सज्ञान झाल्यानंतरच त्याला ते उघडायची परवानगी होती. 'मी त्याला दर वाढदिवशी गिफ्ट देत असे. मात्र हे गिफ्ट त्याला उघडण्यास परवानगी नव्हती.'  मॅथ्यने गिफ्ट उघडलं असलं, तरी अजूनही बाटल्या काही फोडलेल्या नाहीत. त्यामुळे आता या मौल्यवान व्हिस्कीच्या बाटल्या स्वतःच घर घेण्यासाठी कामी येणार आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या