Home /News /videsh /

दावा- 'जिन्ना' यांच्या नावावरून दारूचा ब्रँड, व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ

दावा- 'जिन्ना' यांच्या नावावरून दारूचा ब्रँड, व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ

Alcoholic Drink Named After Jinnah: सोशल मीडियावरील काही फोटोंद्वारे असा दावा केला जात आहे की दारूच्या एका ब्रँडने पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावरून दारूचं नाव Ginnah ठेवलं आहे. अद्याप या दाव्याची पुष्टी झाली नाही आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 02 डिसेंबर: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका दारूच्या ब्रँडमुळे खूप गदारोळ सुरु आहे. एक ट्वीट व्हायरल होत असून पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांच्या नावावरून या दारूच्या ब्रँडचं नाव ठेवण्यात आल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. Ginnah असं या दारूचं नाव असल्याचा दावा या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने (ANI) याची पुष्टी केलेली नाही. परंतु ट्विटरवर यासंदर्भात अनेक ट्वीट शेअर केले जात असून मोठ्या प्रमाणात टीका देखील होतआहे. या ट्वीटमध्ये जिन्ना यांच्या नावाचा संदर्भ देत असं म्हटलं आहे की, इस्लाममध्ये निषिद्ध अशी सर्व कामे त्यांनी केली. पूल बिलियर्ड्स, सिगार, पोर्क सॉसेज बरोबरच स्कॉच, व्हिस्की आणि दारूचे सेवन या सर्व गोष्टींचा वापर केला. ANI च्या अहवालानुसार, एका ट्विटर युजरने Ginnah नावाच्या दारुच्या बाटलीचे फोटो पोस्ट केले आहेत. या बाटलीरील लेबलवर ‘In the memory of the man of pleasure, who was : Ginnah’ असं लिहिण्यात आले आहे. या दारूच्या बाटलीवर इंग्रजीमध्ये असं देखील लिहण्यात आलं आहे की, ही दारू जिन्ना यांच्या स्मरणार्थ लाँच करण्यात आली आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना(Muhammad Ali Jinnah) यांचा जन्म 25 डिसेंबर 1876 ला कराचीमध्ये झाला होता. कराची सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) असून स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश भारताचाच हे शहर एक भाग होता. भारतापासून स्वतंत्र होण्यासाठी पाकिस्तानची मागणी करत त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. जिन्ना यांना पाकिस्तानमध्ये ‘कायदे-ए-आझम’ म्हणून मान दिला जातो. ते पाकिस्तानचे महान नेते आहेत. या दारूच्या बाटलीवरील लेबलवर असं लिहण्यात आलं आहे की, मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे संस्थापक होते. पाकिस्तान 1947 साली अस्तित्वात आला असून धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून याची स्थापना करण्यात आली. यात पुढे असं म्हटलं आहे की, पुढील काही वर्षांमध्ये जनरल मोहम्मद जिया-उल-हक यांनी 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना पदावरून हटवत सत्ता ताब्यात घेतली होती. जिना यांनी पूल बिलियर्ड्स, सिगार, पोर्क सॉसेज बरोबरच स्कॉच, व्हिस्की आणि दारूचे सेवन केल्याचं आणि ते कधीही मान्य न केल्याचं देखील या लेबलवर लिहिण्यात आलं आहे. इस्लाममध्ये दारू हराम नशा आणि सट्टेबाजीला इस्लाममध्ये हराम मानलं जातं. हराम हा एक अरबी शब्द असून याचा अर्थ निषिद्ध असा होतो. कुराण आणि सुन्नाहच्या धार्मिक ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी करण्यास बंदी घालण्यात आली आहे त्या हराम आहेत. जर एखाद्या गोष्टीला हराम समजले असेल तर ती निषिद्ध आहे. भलेही ती गोष्ट करण्यामागे कितीही चांगला उद्देश असला तरीदेखील त्यावर बंदी असल्याने ती हराम समजली जाते. पाकिस्तानी नागरिकांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. एका युजरने ट्विटरवर गिन्नाला राष्ट्रीय पेय बनवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे तर एकाने राष्ट्राच्या संस्थापकांचा नावाने दारूचे नाव असणे अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या