Home /News /videsh /

महिला शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठवायची स्वतःचे न्यूड फोटो अन् बोलावायची कारमध्ये, असा उघड झाला कारनामा

महिला शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठवायची स्वतःचे न्यूड फोटो अन् बोलावायची कारमध्ये, असा उघड झाला कारनामा

एका महिला शिक्षिकेचे (Female Teacher) कारनामे उघड झाले आलेत.

    न्यूयॉर्क, 30 नोव्हेंबर: एका महिला शिक्षिकेचे (Female Teacher) कारनामे पुढे आलेत. जेव्हा ती आपल्याच विद्यार्थिनींना आपल्या चुकीच्या कृत्याचा बळी बनवायची. सुरुवातीला ती स्वतःचे न्यूड फोटो (Nude Photos) विद्यार्थ्यांना पाठवत असे, त्यानंतर ती त्यांना कारमध्ये बोलावायची. या महिला शिक्षिकेची पोल तेव्हा उघडकीस आली जेव्हा तिने तिचा न्यूड फोटो तिच्या एका विद्यार्थ्याला पाठवला आणि त्याला स्वतःच्या गाडीत बोलावून संबंध प्रस्थापित केले. याचा खुलासाही अतिशय आश्‍चर्यकारकरीत्या झाला आहे. ही घटना अमेरिकेतील मिसूरी येथील आहे. 'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, येथील एका शाळेत शिकवणाऱ्या महिला शिक्षिकेशी संबंधित हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्यासोबत असं कृत्य केलं की, ही घटनासोशल मीडियावर व्हायरल तर झालीच, पण तिला तिची नोकरीही गमवावी लागली. हेही वाचा- Breaking News: मुंबईत उद्यापासून सुरु होणार नाहीत शाळा, आयुक्तांनी दिली नवी तारीख रिपोर्टनुसार, शिक्षकानं एका विद्यार्थ्याला स्वतःचा न्यूड फोटो पाठवला आणि त्याला कारमध्ये बोलावून त्याच्याशी संबंध ठेवलं. यादरम्यान त्या विद्यार्थ्याच्या पालकांना संशय आल्यानं त्यांनी मुलाची चौकशी केली. मुलाच्या पालकांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत मुलाने शिक्षिकेच्या सांगण्यावरून आणि दबावाखाली संबंध ठेवल्याचं कबूल केलं. एवढेच नाही तर विद्यार्थ्याची चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या मोबाईलमधील मेसेज पाहिले. मेसेजमध्ये शिक्षिकेनं तिचा न्यूड फोटो पाठवला होता आणि त्यासोबत काही अश्लील गोष्टीही लिहिल्या होत्या. विद्यार्थ्यानं सांगितलं की, एका नदी किनारी शिक्षिकेनं त्यांच्या कारमध्ये संबंध प्रस्थापित केले होते. शिक्षिकेनं मद्यपान केलं होतं आणि त्यालाही मद्यपान करण्यास सांगितलं. पण त्याने ते प्यायला नकार दिला होता. हेही वाचा- मुंबईत Omicron Variant चं अस्तित्त्व?, लवकरच येणार रिपोर्ट ही घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती आणि आता याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय आला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या शिक्षिकेला तिच्या तीन विद्यार्थ्यांसोबत संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायालयानं महिला शिक्षिकेला 20 वर्षांसाठी तुरुंगात पाठवलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: School teacher

    पुढील बातम्या