Home /News /videsh /

चीनमधील हुबेईत हिंसाचार, लॉकडाऊन हटवल्यानंतर शहर सोडण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड

चीनमधील हुबेईत हिंसाचार, लॉकडाऊन हटवल्यानंतर शहर सोडण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड

चीनमधील हुबेईत 68000 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते, तर येथे 3178 जणांचा मृत्यू झाला होता

    बीजिंग, 29 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) जगभरात संसर्ग पसरवणाऱ्या चीनमधून (China) हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. हुबेईतून (hubei) लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोठ्या संख्येने लोक हुबेईतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामुळे मोठी गर्दी जमा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनमधील लॉकडाऊन (Lockdonw) शिथिल करण्यात आले आहे. कॅनडा मीडियाने द ग्लोब एंड मेलने चीनवरील सोशल मीडिया वेबसाईटवर टाकलेले फोटो आणि व्हिडीओचा दाखला देत शुक्रवारी सांगितले की, हुबेईला जवळील प्रांत जियांगशी जोडणाऱ्या पुलावरही हिंसाचार झाला. ऑनलाइन व्हिडीओनुसार मोठ्या संख्येने लोक लॉकगेट उघडण्याचा प्रयत्न करीत आरडाओरडा करीत आहेत. पोलिसांनी काही गाड्या उलट्या केल्या आहेत. दुसऱ्या प्रांतात जाणाऱ्या पुलावर पोलीस तैनात करण्यात आले होते. यानंतर हुबेईतील नागरिक मोठ्या संख्येने या पुलावर जमा झाले व दुसऱ्या प्रांतात जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. यादरम्यान पोलिसांकडून शहर सोडण्याचा प्रयत्न करीत असलेल्यांना अडविण्यात आले. यामुळे मोठा गोंधळ झाला. आता कुठे चीन कोरोनाच्या विळख्यातून सावरत होते. त्यातच एकाच ठिकाणी इतकी मोठी गर्दी झाल्यामुळे भीतीचं सावट निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार साधारण सायंकाळी 6 वाजता येथे मोठा हिंसांचार झाला. संबंधित - लॉकडाऊनमध्ये सलमान खानसंदर्भात मोठी बातमी, 25,000 रोजंदार कामगारांना मदतीचा हात सरकारच्या पॉलिसीनुसार वुहानच्या बाहेर राहणारे व स्वस्थे असलेले नागरिक बुधवारनंतर प्रवास करू शकतात. येथील रेल्वे, बससेवा सुरु करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हुबेईत फक्त एक कोरोनाबाधिक रुग्ण समोर आला होता. हुबेईत आतापर्यंत 68,000 प्रकरणं समोर आली असून यापैकी 3178 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित - कोरोनाच्या लढ्यात त्याची मोदींना 501 रु.ची मदत, पंतप्रधानांनकडून कौतुकाची थाप
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Corona virus in india

    पुढील बातम्या