विजय मल्ल्याला हादरा, लंडनमध्ये 10 हजार कोटींचा खटला हरला

Sachin Salve | Updated On: May 9, 2018 04:32 PM IST

विजय मल्ल्याला हादरा, लंडनमध्ये 10 हजार कोटींचा खटला हरला

08 मे : भारतीय बँकांचे 9 हजार कोटी बुडवणाऱ्या करबुडव्या विजय मल्ल्याला मोठा दणका बसलाय. इंग्लंडमध्ये भारतीय बँकांनी दाखल केल्या खटल्यात विजय मल्ल्याचा पराभव झालाय.

मल्ल्यावर 13 बँकांनी 1.55 अब्ज डाॅलर म्हणजे 10,404 कोटी रुपयाचा खटला दाखल केला होता. लंडनमध्ये या खटल्यावर सुनावणी दरम्यान न्यायाधिश अँड्र्यू हेनशाॅ यांनी मल्ल्याची जगभरातील संपत्ती करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे भारतीय बँकांना इंग्लंडसह वेल्समध्ये असलेल्या मल्ल्याच्या संपत्तीवर कब्जा करण्यास अधिकार प्राप्त होणार आहे. आता विजय मल्ल्या ही संपत्ती कुणाच्याही नावावर करू शकत नाही.

मल्ल्याच्या विरोधात इंग्लंड येथील क्वीन्स बेंच डिव्हिजन आॅफ कमर्शिल कोर्टात भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ बडोदा, काॅर्पोरेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीस बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब आणि सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ म्हेसूर, युको बँक, युनाइटेड बँक आॅफ इंडिया आणि जेएम फायनाशियल एसेट प्राईव्हेट लिमिटेड या बँकांनी खटला दाखल केला होता.

हा निर्णय कर्नाटकातील डेट रिकव्हरी ट्रिब्युनल (डीआरटी) शी संबंधीत आहे. डीआरटीने मल्ल्याला 62,033,503,879.42 रुपये व्याजासह बँकांना परत करण्याचे आदेश दिले आहे.

मल्ल्याच्या वकिलांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता मल्ल्याच्या वकिलांना कोर्टात अपिल करण्यासाठी याचिका दाखल करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2018 12:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close