विजय मल्ल्याकडे नाहीये टिपू सुलतानची तलवार, मग कुणाकडे?

विजय मल्ल्याकडे नाहीये टिपू सुलतानची तलवार, मग कुणाकडे?

टिपू सुलतानची तलवार तुला लाभत नाही, ती अशुभ आहे, तू ती देऊन टाक, असा सल्ला मल्ल्याच्या कुटुंबीयांनी त्याला दिला होता.

  • Share this:

लंडन, 18 एप्रिल : करबुडव्या उद्योजक विजय मल्ल्याकडे असलेली टिपू सुलतानची तलवार त्याच्याकडे नाही अशी माहिती समोर आलीये. लंडनच्या कोर्टात त्याच्या वकिलानं ही माहिती दिली. पण ही तलवार कुणाला दिली, हे मात्र कळू शकलेलं नाही.

टिपू सुलतानची तलवार तुला लाभत नाही, ती अशुभ आहे, तू ती देऊन टाक, असा सल्ला मल्ल्याच्या कुटुंबीयांनी त्याला दिला होता. त्यानंतर 2016मध्ये त्याने ही तलवार एका अज्ञात व्यक्तीला देऊन टाकली. या तलवारची आज 1.80 कोटी इतकी किंमत आहे.

2004 साली मल्ल्यानं एका खासगी लिलावात ही तलवार दीड कोटी रुपये देऊन विकत घेतली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यानं ती मिरवलीही होती.

या तलवारीसाठी टिपू सुलतानच्या सातव्या पिढीचे वंशज साहेबजादा मंसूर अली टिपू यांनी मल्ल्या कुटुंबियांशी वारंवार संवाद साधला. पण मल्ल्या कुटुंबियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. ही तलवार श्रीगंगापटनाच्या टिपू सुलतान संग्राहलय आणि मल्ल्या कुटुंबियाच्या कोणत्याही सदस्याने पहिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 04:44 PM IST

ताज्या बातम्या