नवी दिल्ली, 26 जुलै : भारतातील विविध बँकांमधून कोट्यवधींचं कर्ज (
Loan) घेऊन फरार झालेला किंग्जफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्याला (
Vijay Mallya) लंडन उच्च न्यायालयात (
London High Court) मोठा झटका बसला आहे. विजय मल्ल्या दिवाळखोर (
Bankrupt) असल्याचं न्यायालयानं मान्य केलं असून भारतातील विविध बँकांचं (
Indian banks) म्हणणं न्यायालयानं मान्य केलं आहे.
काय होतं प्रकरण
भारतातील स्टेट बँक ऑफ इंडियासह 13 बँकांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. विजय मल्ल्याने बँकांमधून कर्ज घेतलं असून त्याची परतफेड केली नसल्यामुळे त्याला दिवाळखोर जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भारतातील बँकांनी केली होती. मल्ल्याची दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर त्याची बँकांकडे तारण असणारी आणि इतर संपत्तीदेखील जप्त करून, त्याचा लिलाव करण्याचा अधिकार बँकांना प्राप्त होतो. त्यासाठी 2018 साली या बँकांनी लंडनच्या उच्च न्यायालयात विजय मल्ल्याविरोधात धाव घेतली होती. अखेर आपली बाजू पटवून देण्यात भारतीय बँकांना यश आलं असून मल्ल्याला मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, लंडन हायकोर्टाच्या या निर्णय़ाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं विजय मल्ल्यानं म्हटलं होतं. मात्र त्याला तशी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे लंडनच्या उच्च न्यायालयाचा हा फैसलाच अंतिम राहणार असून बँकांना वसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे वाचा -
मालक आणि मुलाला बसला विजेचा धक्का, पाळीव कुत्र्याने तोंडात तार धरून खेचली पण...
या बँकांचा समावेश
स्टेट बँक ऑफ इंडियासह 13 विविध बँकांचं कर्ज विजय मल्ल्यानं घेतलं होतं. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, जेएम फायनान्शिअल यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.