मल्ल्या पुन्हा मॅच पाहायला गेला, लोकांकडून 'चोर-चोर'च्या घोषणा

मल्ल्या पुन्हा मॅच पाहायला गेला, लोकांकडून 'चोर-चोर'च्या घोषणा

विजय मल्ल्या रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच पाहण्यासाठी हजर होता. मात्र, यावेळी भारतीय चाहत्यांनी मल्ल्याविरोधात 'चोर...चोर', 'भगोडा-भगोडा' जोरदार घोषणाबाजी केली.

  • Share this:

12 जून : भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच पाहण्यासाठी हजर होता. मात्र, यावेळी भारतीय चाहत्यांनी मल्ल्याविरोधात 'चोर...चोर', 'भगोडा-भगोडा' जोरदार घोषणाबाजी केली.

उद्योगपती विजय मल्ल्या परदेशात तिसऱ्यांदा टीम इंडियाचा सामना पाहायला आला होता. मल्ल्या ज्यावेळी ओव्हलवर सामना पाहण्यासाठी आला, त्यावेळी मैदानाबाहेर असलेल्या भारतीय वंशाच्या क्रिकेट चाहत्यांनी जोरजोरात 'चोर..चोर..' ओरडण्यास सुरुवात केली. केवळ घोषणा देऊन प्रेक्षक थांबले नाहीत, तर सामन्यादरम्यानही प्रेक्षकांनी मल्ल्याला 'भगोडा भगोडा' असं म्हणत हेटाळणीही केली.

याआधीही चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील टीम इंडियाचे सामने पाहण्यासाठी विजय मल्ल्या हजर होता. विजय मल्ल्या याने भारतीय बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावला आहे आणि गेल्या 15 महिन्यांपासून भारतातून फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 06:34 PM IST

ताज्या बातम्या