S M L

भारतात सुरू होतेय 'बिकिनी एअरलाईन्स' !

व्हिएतनाममध्ये बिकिनी एअरलाईन्स म्हणून प्रसिद्ध असलेली एअरलाईन्स कंपनी व्हिएतजेट जुलैपासून भारतात व्यवसाय सुरू करणार आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2018 11:43 PM IST

भारतात सुरू होतेय 'बिकिनी एअरलाईन्स' !

20 मार्च : विमान म्हटलं नम्रपणे हात जोडून तुमचं स्वागत करणारी हवाईसुंदरी, तुम्हाला काय हवं, काय नाही याची आदरपूर्वक विचारणा करणारी हवाईसुंदरी..असं चित्र सहज डोळ्यासमोर येतं. पण आता विमानात बिकिनी गर्ल सुद्धा पाहण्यास मिळणार आहे.

व्हिएतनाममध्ये बिकिनी एअरलाईन्स म्हणून प्रसिद्ध असलेली एअरलाईन्स कंपनी व्हिएतजेट जुलैपासून भारतात व्यवसाय सुरू करणार आहे. या एअरलाईन्सची खास गोष्ट म्हणजे या विमानातील एअरहोस्टेस बिकिनीमध्ये असतात.

एअरलाईन्स लवकरच नवी दिल्लीपासून हो ची मिन्ह सिटीसाठी आठवड्यातून चार वेळा सेवा पुरवणार आहे. येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत ही कंपनी भारतात आपला बिझनेस सुरू करण्याची शक्यता आहे.

याआधी व्हिएतजेटमधील हवाई सुंदरींच्या बिकिनी ड्रेसवर बराच वाद झालाय आणि टीकाही झालीय. पण कशालाच न जुमानता त्यांनी आपली ओळख कायम ठेवलीय. आता या बिकिनी एअरलाईन्सचं भारतात कसं स्वागत होतं ते पाहाणं महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 11:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close