व्हिएन्ना, 03 नोव्हेंबर : युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरात (Vienna terror attack) हल्लेखोरांनी 6 शहरात गोळीबार केला. सीएनएनच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रिया सरकारनं हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. सरकारनं या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सुत्रांनी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
व्हिएन्ना पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत आणि अद्याप मदतकार्य चालू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये हल्लेखोर रस्त्यावर असलेल्या लोकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. या हल्ल्यात पोलिसही जखमी झाले आहेत.
वाचा-ऑस्ट्रियात यहुदी मंदिरासह 6 जागांवर गोळीबार, हल्लेखोरासह एकाचा मृत्यू
CONFIRMED at the moment:
*08:00 pm: several shots fired, beginning at Seitenstettengasse
*several suspects armed with rifles
*six different shooting locations
* one deceaced person, several injured (1 officer included)
*1 suspect shot and killed by police officers #0211w
— POLIZEI WIEN (@LPDWien) November 2, 2020
#viennaattack #attaquevienne #ataqueviena #vienaterrorist #terroristvienna #viennaterrorattack pic.twitter.com/Ci4MyAlD35
— Badnews.online (@Badnews42497772) November 2, 2020
वाचा-काबूल पुन्हा हादरलं, विद्यापीठात ISच्या आत्मघातकी हल्ल्यात 22 ठार
व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. ट्वीटमध्ये पुढे असेही सांगितले गेले आहे की अनेकांनी संशयितांना आधुनिक रायफल्ससह पाहिले. गोळीबारची घटना शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी घडली. या घटनेत एका अधिकाऱ्यासह बरेच लोक जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
Breaking - shocking video of terrorists assassinating multiple police in Vienna tonight. A terrorist can be seen doubling back and shooting an injured police officer covering his head. #Vienna #ViennaShooting #ViennaTerrorAttack pic.twitter.com/PgLG8KWIzV
— Sk Boz (@skkboz) November 3, 2020
एकाला मारण्यात यश
याव्यतिरिक्त, पोलीसांमी एका संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, या हल्ल्याची दखल घेऊन लोकांनी घरातच राहावे. अफवांपासून दूर राहावे. तसेच सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा, असे सांगितले आहे.
वाचा-धक्कादायक! गणेशाच्या मूर्तीची विटंबना; पाकिस्तानात प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड
निजोजित हल्ला
ऑस्ट्रियाचे चांसलर सेबॅस्टियन क्राऊसे यांनी याला नियोजित दहशतवादी हल्ला म्हटले आहे. ते म्हणाले, ते पूर्ण तयारीसह आले होते, त्यांच्याकडे स्वयंचलित शस्त्रे होती. त्यांना प्रशिक्षणही दिले होते. दरम्यान, सशस्त्र संशयितांपैकी एक सभास्थानातून बाहेर पडताना दिसला. हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबारही केला. ऑस्ट्रियाचे आंतरिक व्यवहार मंत्री कार्ल नेहमेर यांनी सांगितले की मध्य व्हिएन्नामधील एका प्रमुख सभास्थानाजवळ झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ल्यासारखा दिसत होता.